Monday, 26 December 2011

पत्रकारांचे आभार

नमस्कार,

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने 24 डिसेंबर 2011 रोजी न्यु इंग्लिश स्कुल, रमणबाग, पुणे येथे आयोजित ''ब्राह्मण महाअधिवेशनाला'' आपण आपल्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणुन आर्वजुन उपस्थित राहीलात,  तसेच या कार्यक्रमाला आपल्या वृत्तपत्रातुन  अतिशय उत्तम पध्द्तीने प्रसिध्दी दिलीत, त्याबद्द्ल मी  '' अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या'' वतीने आपले मनःपुर्वक आभार मानतो. आमच्या पुढील काळातील वाटचालीस आपले असेच सहकार्य मिळत राहील अशी आशा करतो.
धन्यवाद !

Monday, 28 November 2011

ब्राह्मण ऐक्य का हवे ?

                       मी माझा नजिकच्या भुतकाळातला प्रवास बघतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं की मी ''ब्राह्मण संघटन''  का करतो आहे ? कारण माझी पार्श्वभुमी आहे ती रा.स्व. संघाची. जरी मी स्वःत स्वयंसेवक नसलो तरी वडिलांमुळे तेच संस्कार झाले आहेत. मग ''हिंदु संघटन'' सोडुन हे ''ब्राह्मण संघटन'' का ? हा प्रश्न मलाच पडतो. आताचे माझे काम अगदी नकळत सुरु झाले. अचानक लॅपटॉप घेतला, फेसबुक काय प्रकार आहे बघायला ते सुरु केले, त्यातुन ''ब्राह्मण एकता'' समुहाला जोडला गेलो, अनपेक्षितपणे ह्या समुहाचा ऍडमीन झालो, त्यातुन मग फेसबुकवरचे ग्रुप एकत्र आणायचे आणि काहीतरी ठोस काम सुरु करायचे ह्या प्रयत्नातुन ''अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाशी'' जोडला गेलो, महासंघानी, श्री. गोविंदजी कुळकर्णी यांनी पण विश्वासानी जबाबदारी दिली आणि सध्याचे माझे काम सुरु झाले. माझ्या प्रश्नाचे उत्तर मलाच मिळाले.
                    प.पु.डॉ. हेडगेवार यांनी 1925 साली एक भलंमोठं कोडे सोडवण्याचे काम हाती घेतले. तुकड्या तुकड्यात विभागलेले एखादे चित्र जोडायचे असे एक लहान मुलांचे कोडे असते त्याप्रमाणे प.पु.डॉक्टरांनी हे तुकड्यात विखुरलेले ''हिंदु'' जोडण्याचे काम सुरु केले. आज त्याला काही प्रमाणात यश आले पण प्रमाण अत्यंत अल्प आहे कारण सार्वजनिकपणे जरी समाज एकत्र दिसतो आहे तरी ते वरकरणी दृष्य आहे, मनातुन अजुनही भेदभाव गेलेला नाही, हे कटु आहे पण सत्य आहे.  हा अमक्या जातीचा, तो तमक्या जातीचा, हा आपला तर तो दुसरा, ही भावना कमी अधिक प्रमाणात का असेना पण असतेच. ''हिंदु संघटन'' हे कार्य इतके वर्ष झाले सुरु आहे तरी असे का ? हिंदु संघटनाच्या प्रयत्नांना पहिला तडा गेला तो म्हणजे गांधीहत्येचा. ज्या ब्राह्मण समाजाला सर्व समाजात अग्रस्थान होते, मान होता त्याला लक्ष्य करण्यात आले, झोडपुन काढण्यात आले, मारण्यात आले. संपुर्ण ब्राह्मण समाज सैरभैर झाला, गोंधळुन गेला आणि नकळत त्याने बचावात्मक भुमिका घेणे सुरु केले. इंग्रज परत यशस्वी झाले. जो समाज बुध्दीवान आहे, प्रभावी आहे तो इतर समाजापासुन दुर गेला. त्यातच रा.स्व.संघावर बंदी आणली गेली. गांधीहत्येचे पाप संघावर टाकले गेले. आतातर ब्राह्मण जास्तच गोंधळला. त्याला ''मी ब्राह्मण आहे'' हे सांगायचीही भिती वाटु लागली. हीच भिती पुढे संकोच, लाज ह्या भावनांमधे बदलत गेली.
                        ब्राह्मण बॅकफुटवर गेला आणि त्याला इतर समाजापासुन दुर करण्याचे, मागे पाडण्याचे काम सोपे झाले. मागासवर्गीयांसाठी आरक्षण आले. दहा वर्षांसाठी म्हणुन लागु झाले पण आजतागायत सुरुच आहे उलट त्यात टक्केवारी वाढत जाते आहे. ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्या असणारा वर्ग एकतर मागे पडतो आहे नाहीतर कर्जात बुडतो आहे पण सधन वर्गाचे ह्याकडे लक्ष नाही कारण आपण ब्राह्मण आहोत ह्याची त्यांना लाज वाटते, संकोच वाटतो, भिती वाटते की आपले इतर समाजातील मित्र आपल्याला काय म्हणतील ? आपल्यावर जातीयवादाचा शिक्का बसेल ह्याची. त्यातही जे थोडेफार स्वःतला ब्राह्मण मानतात ते, हा देशस्थ, तो कोकणस्थ अश्या शाखाभेदात, प्रांतभेदात, भाषाभेदात अजुनच जास्त विभागला गेला.
                         हिंदु ऐक्याला दुसरा फटका बसला तो म्हणजे आपल्या राजकीय व्यवस्थेचा. जातीआधारित राजकारणामुळे हिंदु आपल्या जातीच्या वर्तुळातुन बाहेर येवु शकले नाही. कोणत्या भागात कोणत्या जातीची मतं जास्त, त्या जातीचा उमेदवार द्या, त्यांना शैक्षणिक संस्था द्या, सहकारी संस्था द्या असे उद्योग सुरु झाले, प्रत्येक जातीला, प्रत्येक पंथाला आपल्या ''एकगठ्ठा'' मतांची ''किंमत'' कळत गेली. मग सुरु झाले ''वोटबँके''चे राजकारण. जो उमेदवार आपल्या वोटबँकेच्या आधारावर निवडुन गेला त्यानी त्या जोरावर आपल्याच पक्षाला वेठीला धरले, काही सद्गुरुही ह्यात मागे नव्हते, त्यांनी त्यांच्या पंथाच्या जोरावर फायदा करुन घेतला. ह्या सर्व प्रकारात ''हिंदुऐक्य'' बाजुला फेकले गेले आणि ''जातीला'' महत्व आले. ज्याची संख्या जास्त, ज्याची वोटबँक मजबुत, त्याचे महत्व जास्त असे साधे,सरळ समीकरण तयार झाले.
                                 पण असे समीकरणही असुरक्षित वाटत होते, कारण इतके असुनही ब्राह्मण समाजाचा दबदबा काही क्षेत्रात होताच. धार्मिक क्षेत्रात तर होताच पण अर्थ, व्यवस्थापन, विज्ञान, अभियांत्रिकी अश्या सगळ्याच बौध्दीक क्षेत्रात ब्राह्मण आघाडीवर होता पण ''सुदैवानी'' तो सगळीकडे ''एकटाच'' होता. आपली मक्तेदारी टिकवायला ब्राह्मणांना बौध्दीक क्षेत्रातुनही हद्दपार करणेही आवश्यक होते. मग वेगवेगळ्या महासंघ, पँथर, ब्रिगेड यांच्या माध्यमातुन  ब्राहमण समाजावर वैचारीक हल्ला सुरु झाला. ब्राह्मणांच्या चुका, त्यांचा इतिहास, वेद, पुराण यांचा मनाला वाटेल तसा अर्थ सांगुन इतर समाजाची दिशाभुल करणे, ब्राह्मणांविरुध्द गरळ ओकण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु झाले. त्याला साथ मिळाली ती इंटरनेटची, सोशल नेटवर्कींगची. जे जाहीरपणे बोलु शकत नाही ते सहजपणे खोट्या नावानी ब्लॉग लिहुन, पेज तयार करुन ब्राह्मणविरोधी साहित्याचा प्रसार सुरु झाला. अतिशय योजनाबध्द पध्द्तीने ब्राह्मण समाजाला इतर समाजापासुन तोडण्याचे काम सुरु झाले, इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरु झाला. रामदास स्वामी- छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट कधी झालीच नाही, दादोजी कोंडदेव छत्रपतींचे गुरु नाहीत असा प्रचार करुन पुण्यातील लालमहालातील दादोजींचा पुतळा काढला गेला, अमिताभच्या केबीसीतुन, शालेय पाठ्यपुस्तकातुन दादोजींचा उल्लेख वगळण्यात आला. पुढे रामदास स्वामींच्या बाबतीत काय घडेल काहीच सांगता येत नाही. परवा एका नेत्यावर दुसर्‍यानीच हल्ला केला त्यासाठीही ब्राह्मणांनाच जबाबदार धरुन ''त्यांचे शिरकाण करावे'', '' नामोनिशाण मिटवा'' असा प्रचार खोट्या ब्लॉगवरुन सुरु झाला. खुलेआम ब्राह्मणांच्या कत्तलीचे फर्मान निघते तरीसुध्दा ब्राह्मण ''निद्रिस्त'' आहे.
                              अश्या परिस्थितीत, संपुर्ण हिंदुंचे एकत्रीकरण करायचे असल्यास, ते अतिशय कल्पकतेनी, सावधतेनी आणि संयमानी करावे लागेल. हे काम ब्राह्मण समाज अतिशय उत्तमप्रकारे करु शकतो ह्यात शंका नाही. पण हे करायला संपुर्ण हिंदु समाजाचे नेतृत्व ब्राह्मणांना करावे लागेल आणि आजच्या परिस्थितीत नेतृत्वाचा '' संख्या '' हा एकमेव निकष आहे. ''ब्राह्मण संघटनातुन'' आपली संख्या तयार करणे, आपली मजबुत वोटबँक तयार करणे, आर्थिक शक्ती उभारणे हे अत्यावश्यक आहे. जर ''हिंदु संघटनाचे'' कोडे सोडवायचे असेल, इतर समाजाचे वेगवेगळे तुकडे अलगद जोडायचे असतील तर आपला ब्राह्मण समाजाचा विखुरलेला ''तुकडा'' आधी आपल्याला एकसंध बनवावा लागेल. ''ब्राह्मण एकत्रीकरण'' हा  ''हिंदु संघटनाच्या'' ध्येयाकडे जाण्याचा ''राजमार्ग'' आहे. हिच आजची खरी गरज आहे, असे मला वाटते.
                              







Monday, 14 November 2011

अभ्यास वर्ग


               अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ युवा आघाडी हे युवकांचे खुले व्यासपीठ - श्री. गोविंद कुळकर्णी




                        अ.भा.ब्रा.महासंघाची युवा आघाडी ही तरुणांचे प्रश्न, त्यांना भेडसावणार्‍या समस्या, तरुणांना नोकरी, उ्द्योग ह्याकरिता मार्गदर्शन व सहाय्य आदी उद्देशानी स्थापन करण्यात आली असुन युवकांनी ह्या व्यासपीठाचा मनमोकळेपणानी उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन अ.भा.ब्रा.महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोविंदजी कुळकर्णी यांनी केले.
                         आज दि.13/11/2011 रोजी अ.भा.ब्रा.महासंघाची महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडी कार्यकारिणी घोषित करण्यात आली, तसेच नवनियुक्त प्रदेश पदाधिकारी व पुणे शहर युवा आघाडी पदाधिकारी यांचा संयुक्त अभ्यासवर्गाचे आयोजन शिक्षक भवन, नवी पेठ, पुणे येथे करण्यात आले होते.
                          प्रास्ताविकात श्री. गोविंदजी कुळकर्णी ह्यांनी संघटनेची माहिती, उद्देश, संघटनामत्क बांधणी तसेच संघटनेची युवा आघाडी ही संकल्पना उपस्थित पदाधिकार्‍यांसमोर विषद केली.
                             प्रमुख वक्ते श्री. संदिपजी खर्डेकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत युवकांचे समाजकारणात तसेच राजकारणातील युवकांचे महत्व लक्षात आणुन दिले. 'प्रत्येक सुरवात ही लहानच असते त्यातुन मनाचा तोल ढळु न देता, स्वप्नरंजनात न रमता वर्तमान लक्षात ठेवुन काम करत राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री.खर्डेकर ह्यांनी केले. आपल्या कार्याप्रति प्रामाणिक, सकारामत्क दृष्टीकोन ठेवावा व समाजात घडणार्‍या घटनांविषयी जागरुक राहावे, असा सल्ला त्यांनी युवा पदाधिकार्‍यांना दिला.
                             दुसर्‍या सत्रात श्री. लक्ष्मीकांत धडफळे यांनी प्रदेश युवा कार्यकरिणी जाहीर केली. श्री. दिलीप सरवटे हयांनी ''सकारामत्क दृष्टीकोन '' ह्यावर अभ्यासवर्गात मार्गदर्शन केले.
                               कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय पं.वसंतरावजी गाडगीळ होते. अ.भा.ब्रा.म. राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गोविंदजी कुळकर्णी, श्री. विनोद देसाई (संघटन मंत्री), श्री. भालचंद्र डुघ्रेकर (सरचिटणीस,महा.प्रदेश), श्री. लक्ष्मीकांत धड॑फळे (अध्यक्ष, युवा आघाडी, महा.प्रदेश), श्री. अमोघ टेंभेकर (प्रसिध्दी प्रमुख, महा. प्रदेश) तसेच प्रदेश व शहर युवा पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. नंदकिशोर तांबडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. अमोघ टेंभेकर ह्यांनी केले.
     

Sunday, 23 October 2011

पहिली पायरी

             '' आम्ही मद्यशक्ती पुढे पुर्णपणे हतबल आहोत हे आम्ही मान्य केले. त्याच बरोबर आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे हे सुध्दा आम्ही मान्य केले.''
              ही पहिली पायरी जेव्हा वाचली त्यावेळी पहिला अर्धा भाग एकदम पटला, कारण आजपर्यंत मी अनेकदा दारु बंद करण्याचा निश्चय केला. कधी कधी पत्नीशी भांडण झाल्यानंतर अगदी मुलांची शपथ घेउन तिला सांगीतले कि उद्या पासुन दारु बंद , पण हे तेव्हड्यापुरतेच राहत होते. रात्रीचा दारु बंद करण्याचा निश्चय, सकाळी मी विसरुन जात होतो. दारुचं प्रचंड आकर्षण आणि अतिमद्यपानामुळे आलेली dependency  मला परत दारु पिण्यास बाध्य करायची. दारु न प्यायल्यामुळे होणारा शारिरीक त्रास ( हात पाय कापणे, छातीत धडधड होणे, डोकं दुखणे, अस्वस्थ वाटणे ) ह्यामुळे रात्रीची मुलांची शपथ, पत्नीला दिलेले वचन ह्याकडे दुर्लक्ष करुन दारु प्यायचो. त्यावेळी मनात असायचा कि फक्त सकाळी पिऊ म्हणजे त्रास थांबेल मग परत हात लावायचा नाही. पण, थोडं पिऊन समाधान होत नाही मग असं वाटायचं कि आत्ता एकदाच तर प्यायची आहे मग बंदच करायची आहे तर मग अजुन थोडी प्यायला काय हरकत आहे ? असं करत करत शेवटी मी माझा कोटा पुर्ण होतपर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्त पित होतो. आणि सकाळी जास्त झाली कि परत रात्री उतारा म्हणुन प्यायची मग रात्री जास्त झाली कि मग परत त्याचा उतारा म्हणुन दुसर्‍या सकाळी तोच निश्चय, तोच क्रम ..... हे असंच चक्र सुरु राह्यचे, कारण माझ्यामधे असलेली असमाधानी वृत्ती. एक पेग, दोन पेग पिऊन मी दारु पिणं थांबवु शकत नाही. जो पर्यंत मला किक् बसत नाही तो पर्यंत माझे समाधान होत नाही, तोपर्यंत मला दारु हवी असते.
              मला हे मान्य करावेच लगेल कि मी दारुपुढे पुर्ण हतबल आहे, कारण मी जेंव्हा स्वःला सुशिक्षीत, चांगल्या घरातला मुलगा समजतो पण दारुसाठी मी आजपर्यंत किती लाचार होतो ? कोणालाही पैसे उधार मागणे, बारवाला, पानपट्टीवाला, अगदी गाडी पंक्चर दुरुस्तीवाल्याकडुन पैसे उधार घेताना मी स्वाभिमान विसरत होतो. कोण्त्याही अंड्याच्या गाडीवर, कचराकुंडीच्या बाजुला, नाल्याच्या बाजुला बसुन मी दारु पित होतो. कोणाचाही उष्टा पेला मला चालत होता, कोणतेही पाणी मी पित होतो, प्रसंगी कोरी दारु पण पीत होतो. हे आठवले की लक्षात येते, मी मद्यशक्ती शारिरीकदृष्या  आणि मानसिकदृष्या पूढे पुर्णपणे हतबल आहे. शारिरीक ह्यासाठी की, जी  Dependency  माझ्यात आली आहे, की दारु पिलो नाहीतर माझे हात पाय कापतात, छातीत धडधड होते, अस्वस्थ वाटायला लागतं आणि हा त्रास मी सहन करु शकत नाही हे थांबवायला मी पुन्हा दारु पितो. मानसिकदृष्या मी दारुपुढे हतबल आहे. दारु प्यायल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढतो, माझी एनर्जी वाढते, कोणतेही काम मी जास्त चांगल्याप्रकारे करु शकतो, या माझ्या (गैर) समजामुळे मी परत परत दारु पितो. घडतं उलट ... काम चांगले व्हावे म्हणुन मी थोडी प्यायला जातो पण माझा कोटा पुर्ण होतपर्यंत माझं समाधान होत नाही, मग दारु जास्त झाली की माझा आत्मविश्वास 'शुन्य' होतो, एनर्जी वाढण्याएवजी मी झोपुन जातो, यावरुन हेच दिसते की मी दारु पुढे हतबल आहे.
            ही हतबलता माझ्या कमकुवत मानसिकतेमुळे आली आहे. लहान लहान गोष्टींवर अवलंबुन राहण्याची जी माझी मानसिकता त्यामुळे मी दारुवर पण अवलंबुन राहु लागलो. एखाद्या दिवशी मोबाइल घरी विसरलो किंवा बॅटरी डिसचार्ज झाली तर मी खुप अस्वस्थ होतो. मोबाइल नसल्यामुळे माझे खुप अडते अश्यातला काही भाग नाही तरी पण मी अस्वस्थ होतो. हाताला घड्याळ नसले तरी मी तसाच अस्वस्थ होतो. कधी गाडी खराब असली तर मी इतर मार्गानी काम करण्यापेक्षा आज माझ्याजवळ गाडी नाही, आज काहीच काम होणार नाही म्हणुन बारमधे जाउन बसतो. कोणत्याही अडचणीवर मार्ग काढण्यापेक्षा माझे नशीब किती खराब आहे याचे रडगाणे गात बारमधे बसतो. ह्या मानसिकतेमुळे मी दारु बंद करण्यासाठी जे प्रयत्न केले ते असफल ठरले. शारिरीक आणि मानसिक  Dependency माझ्यात असल्यामुळे मी माझ्या एकट्याच्या बळावर दारु बंद करु शकत नाही, आणि ज्या गोष्टी आपण स्वबळावर करु शकत नाही त्यापुढे हे मान्य करावेच लागेल की आम्ही मद्यशक्ती पुढे पुर्णपणे हतबल आहोत.
                  पहिल्या पायरीचा दुसरा अर्धा भाग ''आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे हे सुध्दा आम्ही मान्य केले,''  खरंच, व्यसनाधिनतेच्या काळाचा विचार करताना आठवलं की आपण किती अस्ताव्यस्त आयुष्य जगत आहोत. सर्वसामान्य आयुष्य कसं जगतात हेच विसरलो आहोत. सुदृढ शरीराची संपुर्ण माती झाली, हात पाय कापणे, छातीत धडधडणे, अस्वस्थता, कोणत्याही कामात मन न लागणे, पचनशक्ती कमी झाली, स्मरणशक्ती कमी झाली, स्टॅमिना कमी झाला हे शारिरीक नुकसान तर झालेच पण दारु पिण्याच्या प्रबळ इच्छेपुढे शरीराच्या स्वच्छतेकडेही लक्ष नव्हते. सकाळी जाग आल्यावर दारु प्यायची इतकी घाई झालेली असायची की कधी दात घासत नव्हतो, आंघोळ करत नव्हतो, मळलेले, चुरगळेले , घामाचा वास येत असलेले कपडे, वाढलेली दाढी अश्या अवतारात बारमधे कोणी मला बघितल्यानंतर त्यांना विश्वास बसायचा नाही की हा एका क्लास वन ऑफीसरचा स्वःत इंजिनिअर असलेला मुलगा आहे. जेवणाकडे, खाण्याकडे दुर्लक्ष हा तर रोजचाच प्रकार होता. पोट भरलेलं असेल तर दारुची किक् बसत नाही म्हणुन आधी उपाशी राह्यचे आणि नंतर दारु इतकी जास्त व्हायची की जेवणाची, काही खाण्याची इच्छाच राह्यची नाही, त्यामुळे प्रचंड ऍसिडीतीचा त्रास सुरु झाला, अशक्तता आली, डोळ्यापुढे अंधारी यायची, चक्कर यायची, मग्‍ त्यासाठी ग्लुकोज घ्यायचे, सलाईन घ्यायचे पण दारु बंद करावी, असा विचारही मनात येत नव्हता. शरीराची धुळधाण होत होती पण त्याकडे लक्ष न देता दारु पिणे सुरुच होते.
               ह्याकाळात माझ्या मानसिकतेमधे ही खुप बदल झाला होता. जगण्यातला आनंद मी विसरलो होतो, कोणत्याही गोष्टीत इंटरेस्ट, उत्साह वाटत नव्हता. स्वभावात खुप विचित्र बदल झाले होते. लोकांप्रति, कुटुंबियांप्रती, प्रेम, आस्था वाटेनाशी झाली होती. को













                   




Wednesday, 19 October 2011

आभार !!!

 काल माझ्या वाढ्दिवसानिमीत्तानी आपण सर्वांनी फोन, sms, फेसबुकच्या माध्यमातुन माझ्यावर शुभेच्छांचा जो वर्षाव केला त्याचे आभार मानायला माझ्याजवळ शब्द नाहीत, खुप खुप आभार !!!!! 
आपले प्रेम असेच राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!




Thursday, 6 October 2011

परिचय पत्र

नमस्कार,
                  मी,  अमोघ अनंत टेंभेकर, व्यवसाय - सिव्हील इंजिनिअर, सध्या पुणे येथे कार्यरत आहे.
 आपणांस कळविताना आनंद होतो आहे, नुकतेच "अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ" यांनी माझी  "प्रसिद्धी प्रमुख (महाराष्ट्र) " ह्या पदावर नेमणुक करून मला सन्मानित केले आहे.
                "अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ" ही राष्ट्रीय संघटना असून सध्या संपूर्ण भारत देशात १२ राज्यात समाजबांधवांचे एकत्रीकरण व सबलीकरण करण्याचे कार्य संघटना करीत आहे. आपल्या प्रबळ संघटन बांधणी व कार्यकर्त्यांच्या सहाय्याने ब्राह्मण समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न संघटना प्रभावीपणे करीत आहे. ह्या कार्याला अधिक गती मिळावी व हे कार्य अधिक जोमानी पुढे जावे ह्यासाठी संघटनेची "युवा आघाडी" नेमण्यात येत आहे. मागील महिन्यात पुणे शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची घोषीत झाली आहे.
                  "अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ" यांनी ऑगस्ट महिन्यात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती निमित्तानी दुचाकी रॅली,  मागील महिन्यात, आगामी महानगरपालिका व जि.प. निवडणुकीत ब्राह्मण समाजाची भूमिका काय असावी ? ह्यावर एक चर्चासत्र आयोजित केले होते, तसेच 24 डिसेंबर 2011 रोजी पुणे जिल्ह्यातील नागरिकांचा भव्य ब्राह्मण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. www.brahmanmahasangh.org ह्या वेब साईटच्या माध्यमातून वधु-वर सूचक आणि नोकरीविषयक माहिती देणे हा उपक्रम सुरु होत आहे. अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजबांधवांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांना संघटीत करणे हा "अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा" उद्देश असेल.
                 वेळोवेळी होणाऱ्या अश्या कार्यक्रमांची प्रसिद्धी चांगल्या रीतीने व्हावी, ही जबाबदारी माझ्यावर असेल. ह्या कार्यात आपले बहुमोल सहकार्य मला लाभावे अशी अपेक्षा आहे. त्याकरिता हा प्रपंच !
आपल्या प्रतिसादाची वाट बघत आहे.

धन्यवाद !
                                                                                                                                 आपला,

                                                                                                                     अमोघ अनंत टेंभेकर
                                                                                                                        ९८ २३६ ३७ २३२
                                                                                                           mediams@brahmanmahasangh.org
                                                                                           

Sunday, 2 October 2011

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

                कृपया प्रसिद्धीकरिता 
 अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित ब्राह्मण समाजाचा चिंतन मेळावा
आज दिनांक २ आक्टोबर २०११ रोजी लोकमान्य सभागृह, केसरी वाडा , नारायणपेठ , पुणे येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फ़े आगामी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकी मध्ये ब्राह्मण समाजाचे धोरण काय असावे या विषयावर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये पुणे शहरात ब्राह्मण समाजाकरीता कार्यरत  आसलेल्या सुमारे २८ संघटनाचे पाधाधिकारी, युवक आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते. वेदमंत्राच्या घोषामध्ये ठिक ११ वाजता मेळाव्यास सुरवात झाली.
 आखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री गोविंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात त्यांनी ब्राह्मण समाजास कोणताही पक्ष वर्ज्य नाही. आज सर्व समाज एकत्र असून आमची दखल सर्वच राजकीय  पक्षांनी घ्यावी इतके सामर्थ्य ब्राह्मण समाजाकडे आहे. आज पर्यंत आम्ही ब्राह्मण समाज म्हणुन कोणात्याही निवडणुकीत भाग घेतलेला नसला तरी कोणत्याही उमेदवाराचे राजकीय भविष्य ठरविण्याइतके सामर्थ्य ब्राह्मण समाजाकडे आहे त्यामुळे  सर्वच राजकीय पक्षानां आता ब्राह्मण समाजाची दखल घ्यावी लागणार आहे हे निश्चीत आहे असे सांगितले. ह्यापुढे ब्राह्मण समाजाची भूमिका ही निर्णायक असणार आहे अशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची ठाम भूमिका मांडली.
पुण्यातील प्रसिध्द कायदेतज्ञ श्री. प्रमोद आडकर म्हणाले की “ महानगरपालिके मध्ये स्वच्छ चारित्राचे उमेदवार हवे असल्यामुळे जास्तीत जास्त ब्राहमण समाजातील व्यक्तीनी निवडणुकीत भाग घेतला पाहीजे, जर योग्य उमेदवार असून फ़क्त पैश्याअभावी त्यास निवडणुक लढविणे शक्य नसेल तर त्या साठी निधी गोळा करुन अश्या योग्य आणि सक्षम उमेदवारास निवडुन दिले पाहिजे, यासाठी ब्राह्मण समाजातील उद्योजकांनी सढ्ळ हातानी मदत केली पाहिजे, असे नमूद केले.
श्री माधव दामले यांनी महापालिकेची निवडणुक प्रभागवार कशी होणार आहे. आपणांस कसे मतदान करणार आहोत याची मुद्देसुद माहिती दिली. पुणे महापालिकेमध्ये चांगले उमेदवार का हवे आहेत याचे महत्व त्यांनी उदाहरणे देवुन सांगितले. विविध विकास कामे कशी करता येतील  याची माहीती. दिली.
श्री . ह. मो. मराठे यांनी ब्राह्मण वर्गाने सक्रिय राजकारणात का भाग घेतला पाहिजे हे सांगितले. यापुढे या देशात जाती द्वेषावर आधारित राजकारण चालणार नाही. आपल्या राजकिय फ़ायद्यासाठी काही राजकिय पक्ष ब्राह्मण समाजावर टिका करुन राजकीय फ़ायदा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण असे जातीद्वेषाचे राजकारण फ़ार दिवस चालत नाही. जनतेपुढे त्यांचा खरा चेहरा येण्यास वेळ लागत नाही. त्या मुळे कोणी ब्राह्मण द्वेषाचे  राजकारण करु नये. ठणकावुन सांगितले. जर तसा कोणी प्रयत्न केला तर ब्राह्मण समाज तो सहन करणार नाही. मतपेटी द्वारे  तो आपला रोष व्यक्त केल्याशिवाय रहाणार नाही. ही जाणीव त्यांनी राजकियपक्षांना करुन दिली.
या मेळ्याव्यात अनेक तरुण तरुणींनी आपली मते मांडली. स्वागत श्री. माधव हरिहर यांनी केले, श्री. प्रल्हाद काकडे यांनी सूत्रसंचालन केले तर श्री. लक्ष्मीकांत धडफळे  यांनी आभार मानले.  आरती देशपांडे यांच्या पसायदानाने कार्क्रमाची सांगता झाली. अशी माहिती श्री. अमोघ टेंभेकर (प्रसिद्धी प्रमुख, अ.भा.ब्रा.म.) यांनी दिली.

Monday, 22 August 2011

प्रेस नोट पेशवे जयंती

                                                  कृपया प्रसिद्धीसाठी
            श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त अभिवादन रॅली 

     रविवार दि.२१  ऑगस्ट २०११ रोजी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे, त्या थोर, निधड्या छातीच्या, अपराजित, सेनानायकाच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी "अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ" यांच्या वतीने  दुचाकी रॅली व पदयात्रेचे आयोजन यशस्वी आयोजन  करण्यात आले. रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी पुतळा, कोथरूड येथून मा.आ. श्री. चंद्रकांतजी मोकाटे यांच्या उपस्थितीत पं. वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. शिवाजी पुतळा, कोथरूड येथून म्हात्रे पूलमार्गे नानासाहेब पेशवे यांच्या समाधी स्थळी साफसफाई व दीप पूजन करून, रॅली कुमठेकर रस्ता मार्गे चिमाजी आप्पा समाधी स्थळ (ओंकारेश्वर मंदिर) येथे पोहोचली, तिथे दीपपूजन  करून सामील बंधू आणि भगिनींनी पदयात्रेद्वारे शनिवारवाडा कडे प्रस्थान केले. संपूर्ण रॅलीमध्ये तरुणांनाचा प्रचंड प्रतिसाद होता, "बाजीराव पेशवे कि जय", "ब्राम्हण एकता जिंदाबाद" अश्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
         शनिवारवाडा येथे बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सांगता समारोहाचे प्रास्ताविक श्री. गोविंद कुलकर्णी यांनी केले तर श्री. उदयसिंहजी पेशवे (पेशवे वंशज) व श्री. मंदार परळीकर, श्री.संदीप खर्डेकर व श्री. मोहन शेटे ह्यांनी  उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन श्री. देवव्रत बापट यांनी केले. यावेळी श्री. अनिल गानू हेही उपस्थित होते.
          श्री. भालचंद्र दुघ्रेकर, सचिव (अ.भा.ब्रा.म.) आणि श्री. लक्ष्मीकांत धडफळे, अध्यक्ष (अ.भा.ब्रा.म. युवा) यांनी  या महा रॅलीमध्ये सामील ब्रम्हवृन्दांचे आभार मानले व भविष्यात असे अनेक कार्यक्रम करण्याची योजना असल्याचे सांगितले. 

Thursday, 18 August 2011

बाजीराव पेशवे जयंती

                                         कृपया प्रसिद्धीसाठी
            श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त अभिवादन रॅली 

     रविवार दि.२१  ऑगस्ट २०११ रोजी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे, त्या थोर, निधड्या छातीच्या, अपराजित, सेनानायकाच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी "अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ" यांच्या वतीने  दुचाकी रॅली व पदयात्रेचे आयोजन करण्यात आली आहे, अशी माहिती  श्री. लक्ष्मीकांत धडफळे ( अध्यक्ष, अ.भा.ब्रा.म. युवा.) व श्री. अमोघ टेंभेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
                   रॅलीची सुरुवात शिवाजी पुतळा, कोथरूड येथून शिवरायांना मानवंदना देवून होईल. पं. वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात सकाळी ठीक ९.०० वाजता होईल. तिथून म्हात्रे पूलमार्गे नानासाहेब पेशवे यांच्या समाधी स्थळी साफसफाई व दीप पूजन करून, रॅली कुमठेकर रस्ता मार्गे चिमाजी आप्पा समाधी स्थळ (ओंकारेश्वर मंदिर) येथे पोहचेल, तिथे दीपपूजन  करून सामील बंधू आणि भगिनी पदयात्रेद्वारे शनिवारवाडा कडे प्रस्थान  करतील. शनिवारवाडा येथे श्री. गोविंद कुलकर्णी  ह्यांच्या हस्ते बाजीराव पेशवे यांना पुष्पहार अर्पण केला जाईल.
          सांगता समारोहास श्री. गोविंद कुलकर्णी हे अध्यक्षस्थानी राहतील तर श्री. उदयसिंहजी पेशवे (पेशवे वंशज) व श्री. अनिल गानू  हे प्रमुख पाहुणे असतील. श्री. मंदार परळीकर व श्री.संदीप खर्डेकर हे उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करतील.
          या महा रॅली मध्ये जास्तीत जास्त ब्रम्हवृन्दांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुणे ब्राम्हण संस्था, चित्पावन अस्तित्व, पुणे, ब्राम्हण एकता (फे.बुक), देशस्थ ब्राम्हण संघ (फे.बुक) ब्राम्हण युवा संघटना (फे.बुक) इत्यादी सहयोगी संस्था व अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ यांच्या वतीने करण्यात आले आहे. 
           


























































Saturday, 13 August 2011

ब्राम्हण एकता - 3


       "ब्राम्हण एकता" ग्रुपच्या पुढील महत्वकांक्षी वाटचालीची रूपरेषा आपल्यासमोर मांडत आहोत.

Bramhan Ekta, Pruod 2B Brahmin, Facebook Brahmin Internatinoal Limited, Brahmin Yuva Sangh, Nagpur Brahmin, चित्पावन मित्र मंडळ (पुणे), Brahman sena, Yuva Brahman, 
आपण सगळे ब्राम्हण, Jalgoan District's Brahmins  हे सर्व फेसबुकवरील ग्रुप (ह्यात वाढ होत राहील) आणि "अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ" मिळून प्रत्यक्ष काम करतील. ह्यासाठी विभागवार, जिल्हावार आणि तालुकावार असे कार्यकर्ता असतील. हे काम सुलभपणे व जलदगतीनी व्हावे ह्यासाठी संपूर्ण काम www.brahmanmahasangh.org ह्या वेबसाईटच्या माध्यमातून केले जाईल. पण, सर्व ग्रुप आहे त्याच  पद्धतीनी सुरु राहतील.

कामाचे स्वरुप : 
१) ब्राम्हण समाजाचे सांस्कृतिक आणि सामाजिक एकत्रीकरण करणे.
२) समाजातील गरजू व्यक्तींना योग्य ती मदत करणे 
अथवा मिळवून देणे.
३) समाजातील अंधश्रद्धा दूर करून शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण करणे तसेच कालबाह्य रूढी, परंपरा नष्ट करण्यासाठी प्रबोधन करणे.
४) युवक व महिलांसाठी नोकरीविषयक, उद्योगविषयक माहिती देणे आणि त्यात मदत करणे. 
५) वधु - वर सूचक मंडळ, ज्याद्वारे समाजातील कुटुंबांना अधिक परिवारांची माहिती उपलब्ध होईल.
६)वैदिक संस्कार, कौटुंबिक समुपदेशन, व्यसनमुक्तीसाठी सल्ला व समुपदेशन ह्यासाठी विशेष प्रयत्न.
७) ह्या कामासाठी वरील सर्व ग्रुपच्या प्रतिनिधींचे एक संयुक्त मंडळ काम करेल.
 
आपले प्रेम व शुभेच्छा आमच्या पाठीशी सदैव असतील ह्याची खात्री आहे, आपल्या सुचनांचे सदैव स्वागत आहे.
    धन्यवाद !

Saturday, 16 July 2011

मान्यवरांना पत्र

नमस्कार,
आम्ही फेसबुकवर " अतिरेक्यांपासून समाजाचे संरक्षण " नावाचा ग्रुप सुरु केला आहे.(https://www.facebook.com/?sk=inbox&action=read&tid=WVIX37ifQri67ZuQynCsgQ#!/groups/atireki.nako?ap=1 ) ही ग्रुपची लिंक आहे. आपणही त्यात सामील आहात. ( तसे notification आपल्याला आले असेलच) आपला उद्देश कोणालाही विरोध करणे असा नाही तर अतिरेकी हल्ले कसे रोखता येतील, त्याबाबत काय व कशी खबरदारी घ्यावी आणि दुर्दैवानी तशी घटना घडलीच तर विचलित न होता मदतकार्य सुरु करणे ह्याबाबत जागृती करणे असा आहे. संरक्षण दलातील मान्यवर, पोलीस अधिकारी, डॉक्टर्स असे विविध क्षेत्रातील जाणकार ह्यावर ग्रुपमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. पण, हे सगळे फेसबुकपुरता मर्यादित न राहता सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपल्याला कार्यकर्त्यांची फळी पूर्ण राज्यात उभी करायची आहे. प्रत्येक जिल्हा, तालुका इथपर्यंत हि साखळी तयार करण्याचे उद्दिष्ठ आहे. ह्यादृष्टीनी आपली मदत अपेक्षित आहे. ह्यात कुठलाही राजकीय विचार नाही, सर्वसामान्य नागरिकांना जागरूक बनवणे, सतर्क राहणे आणि संघटीतपणे दहशतवादाचा मुकाबला करणे असा साधा उद्देश आहे. आपले मार्गदर्शन आणि आपली मदत अपेक्षित आहे. धन्यवाद !
( आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत )

दृष्टीकोन

आपल्या ग्रुपचा मुळ उद्देश समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून दहशतवादाचा विरोध करणे असा आहे. कोणताही राजकीय पक्ष, धर्म, जात, पंथ ह्याला आपला विरोध नाही. दहशतवादाला विरोध म्हणजे नेमके काय करायचे ? निदर्शने करायचे, मोर्चा काढायचा, जाहीर सभा घ्यायच्या, नारे द्यायचे ? असे अजिबात नाही. आपला विरोध झालेल्या घटनांवर तिखट प्रतिक्रिया देणे असा अभिप्रेत नाही तर, अश्या घटना होऊ नये, ह्याला पायबंद बसावा आणि दुर्दैवानी असे काही घडले तर त्वरित आपण संघटीतपणे मदतकार्य सुरु शकलो पाहिजे अशी रचना आपल्याला उभी करायची आहे. अश्या घटना घडू नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, बाहेर वावरताना आपल्या भोवती काय सुरु आहे ह्याचे भान कसे ठेवावे, संकटकाळी कोणाशी संपर्क करायचा आणि कसा करायचा, अशी घटना घडलीच तर न घाबरता, न गोंधळता त्वरित मदतकार्य कसे सुरु करायचे हे आपल्याला समाजापर्यंत पोहचवायचे आहे. आपण सर्व मित्र ह्या ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात राहू, आपल्यातले जाणकार मार्गदर्शन करतीलच तसे खबरदारीचे उपाय आपण सर्व समाजापर्यंत पोहचवण्याचे काम करू. 
आता आपण जिल्हावाऱ, तालुकावार आपल्यातील नावांची यादी बनवतो आहोत जेणेकरून संपर्क करणे, मदतकार्य सुरु करणे ( ह्यात अगदी आर्थिक मदत ते रक्तदान सर्व आले) जास्त सोपे होईल. आपल्यात जवळपास सगळ्या जिल्ह्यातले मित्र सामील आहेत, ज्याला जसे सोयीचे असेल तसे काम आपण वाटून घेऊ. ज्यांना ह्यात प्रत्यक्ष काम करण्याची इच्छा आहे त्यांनी संपर्क साधावा, आणि जे प्रत्यक्ष काम करू शकत नाहीत त्यांनी आपले निरीक्षण, अनुभव, त्यांच्या काही कल्पना आणि हे कार्य अधिक प्रभावी कसे होऊ शकेल ह्याबद्दल आम्हाला सूचना कराव्यात. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. आपल्यात प्रत्यक्ष संघटन क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर आहेत, त्यांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे. शेवटचे पण महत्वाचे, ज्यांना काही कारणांनी प्रत्यक्ष काम करता येत नसेल त्यांनी अजिबात संकोच बाळगू नये, सर्वांचे ग्रुपमध्ये तेव्हडेच महत्व आहे, आपल्या सूचना प्रत्यक्ष काम करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात, आपला सदैव सहभाग सुरु ठेवावा. धन्यवाद !

Wednesday, 22 June 2011

ब्राम्हण एकता - माझे मत २

                               "ब्राम्हण एकता" ह्या विषयाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा आहे. सगळे सहमत असतीलच असे नाही. मी फक्त माझा दृष्टीकोन मांडतो आहे. मागे मी ह्या विषयावर एक पोस्ट दिली आहे, ती Docs मध्ये बघता येईल.
                                आज  "ब्राम्हण एकता"  हा आपला मंच आहे, आपले उद्दिष्ट ब्राम्हण लोकं एकत्र येणे हा आहे, सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा राजकीय मंच नाही. आपल्याला ह्या मंचावर वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक विचारांची देवाण-घेवाण अपेक्षित आहे. तसे बघता आज आपल्या देशासमोर अनेक प्रश्न उभे आहेत, अश्या परीस्थितीत आपण फक्त "ब्राम्हण एकता"  हे का करतो आहोत? आपण एक नागरिक म्हणून का एकत्र येत नाही? आपण जातीआधारित ग्रुप स्थापन करून फुट पाडतो आहोत का? इतर जाती ,पंथ,धर्म ह्यांना दूर करतो आहोत का? असेही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ह्याचे उत्तर ठामपणे "नाही" हेच आहे. आपण जो ग्रुप स्थापन केला आहे, तो कुणाला विरोध म्हणून नाही, किंवा आपल्या काही मागण्या मान्य करून घेण्यासाठी नाही, आपला सरळ साधा उद्देश ब्राम्हण समाजानी एकत्र येणे एव्हढाच आहे. आपले "सक्षमीकरण" हे आपले उद्दिष्ट आहे. "विरोध" हा आपला पाया नाही. आपली "एकता" हा आपला पाया आहे.
                                  "ब्राम्हण एकता" ह्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून बघितले तर खूप चांगले आशादायक चित्र उभे राहते. जसे मी आधीच्या पोस्टमध्ये म्हटले होते कि आज आपण मराठी भाषिक ब्राम्हण एकत्र येवू  आणि नंतर हळू हळू इतरांनाही सामील करत जाऊ आणि सामाजिक समरसतेतून एकात्मिक भारताची पायाभरणी करू. हे कितपत शक्य आहे, ह्याला किती वेळ लागेल हा प्रश्न आहे पण त्या दृष्टीनी आपण सुरुवात तर करू शकतो, तेच आपल्याला करायचे आहे, आपल्यातील एकजूटता विरोधासाठी नाही तर आपली ताकत वाढवण्यासाठी करायची आहे.
                                       असा व्यापक दृष्टीकोन ठेऊन आपल्याला एकत्रीकरण करायचे आहे. आपला सध्याचा उद्देश अगदी साधा आहे, तो म्हणजे मराठी भाषिक ब्राम्हणांचे वैचारिक, सांस्कृतिक एकत्रीकरण. त्यासाठी अगदी साधा निकष आपण ठेवला आहे तो म्हणजे " मराठी भाषिक ब्राम्हण".  ब्राम्हण समाजातील शाखा, उप-शाखा, त्यांची जीवनपद्धती, खाद्य-संस्कृती, त्यांची प्रादेशिक स्थिती, भौगोलिक सीमा आदी बाबी निकष ठेवणे व्यावहारिक ठरणार नाहीत. "मराठी भाषिक ब्राम्हण" हे ध्येय असल्यामुळे एखादी शाखा, त्यांची खाद्द्य-संस्कृती ह्यावर आक्षेप योग्य वाटत नाही. मला ह्याबाबतीत आपल्या मित्रांचे तीव्र मतं पूर्णपणे माहिती आहेत. पण आजची वास्तविक परिस्थिती बघता काही प्रश्न उपस्थित होतात. आपल्याला "ब्राम्हण" म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे?  रुढीप्रिय, पारंपारिक, कर्मठ ब्राम्हण ? ज्याचा इतर समाजाशी खूप कमी संपर्क असेल, जो आपल्याच कोशात असेल. पूर्वी ज्या कारणामुळे आपला समाज इतर समाजापासून दुरावला होता.आपल्या रूढीप्रियतेनी, कर्मठ वागणुकीने आपल्याच बांधवांना आपण बहिष्कृत  केले, त्यांना दुसरा धर्म स्वीकारावा लागला, आज आपणही तसेच वागायचे का ? सगळ्यात महत्वाचे कि जसे "ब्राम्हणत्व" अपेक्षित आहे ते आजच्या काळात व्यावहारिक आहे का? तेवढा वेळ आज आपल्याकडे आहे का ? आणि समजा तसे वागलोही तर आजच्या जगाच्या प्रवाहापासून आपण बाहेर फेकले जाणार नाही का ? आज आपले अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात आपणच प्रवाहातून बाहेर फेकले जाणार नाही याची ही काळजी घ्यावी लागेल.
                                    माझ्या ह्या विचारावर अनेक आक्षेप येणार याची मला कल्पना आहे. शाकाहार-मांसाहार, धार्मिक आचरण, वैदिक वारसा, quantity-quality असे मुद्दे येणार आहेत, पण हे सगळे ह्या एकाच पोस्टमध्ये सामावणे शक्य नाही. जसे जसे मुद्दे येतील तसा आपण विचार करत राहू. माझी अपेक्षा एवढीच आहे कि, "ब्राम्हण एकता" हा मुद्दा विचारात घेताना आपली मुलभूत तत्वे न सोडता वर्तमानात आपण प्रगती कशी करू ? ह्यावर विचार व्हावा.  "ब्राम्हणत्व" हा विचार करताना वर्तमानातील "सत्य" स्वीकारावे लागेल. आपल्या समाजातील "आज" आणि  "उद्या" ह्या दृष्टीनी विचार व्हावा, "काल" थोडा बाजूला ठेवावा लागेल. संपूर्ण ब्राम्हण समाजाचे एकत्रीकरण हे ध्येय असल्यामुळे लवचिकता ठेवावी लागेल.
                                     हा माझा विचार आहे, निर्णय नाही. ह्यावर चर्चा अपेक्षित आहे, विरोधही अपेक्षित आहेच. आपले मत मुद्देसूद असल्यास चर्चा करणे अधिक सोयीचे राहील. धन्यवाद !!!                                

Thursday, 16 June 2011

ब्राम्हण एकता - माझे मत

                                ब्राम्हण एकता ह्या विषयावर बऱ्याच लोकांचे मत बघितले. अनेकांचा असा समज आहे कि, ब्राम्हण संघटीत होणे हा "संकुचितपणा" आहे, ब्राम्हण म्हणून संघटीत होणे "प्रतिगामी" आहे, आपण एक माणूस म्हणून संघटीत होण्याची गरज आहे. वरकरणी हे विचार योग्य वाटतात, पण ह्या प्रश्नाकडे  बघण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा आहे.
                                एक देश, एक विचार हा खूप जुना नारा आहे. पण ते साध्य करणे अजूनही आपल्याला जमलेले नाही, उलट दिवसेंदिवस वेगवेगळ्या धर्मात, जातीत तेढ निर्माण करण्याचे उद्योग काही समाजद्रोही बिनबोभाटपणे करतात आहेत, आणि आपण ते मुकाटपणे बघतो आहोत. आज देश पातळीवरही आपण काहीच करू शकत नाही, भ्रष्ट यंत्रणा, राजकीय अपयश, सरकारी तिजोरीवरचा डल्ला, जाती-धर्मात तेढ हे आपण मुकाटपणे सहन करतो आहोत, कारण आपल्या विचारांमध्ये साम्य असले तरी आपण वेगवेगळे आहोत, एक बुलंद नारा द्यायला एक होणे गरजेचे आहे. पण आता प्रश्न येतो कि, एवढे सगळे वेगवेगळे प्रश्न असताना आपण "ब्राम्हण" म्हणून का एकत्र यायचे ? एक नागरिक म्हणून का नाही ? ह्याचे उत्तर अगदी साधे आहे, आज आपल्याच नावेला भोकं पडली आहेत, आणि आपण देशाचं जहाज किनाऱ्यावर नेण्याच्या गप्पा करतो. आजची गरज आहे ती आपल्या नावेची भोकं बंद करून आधी आपली नाव भक्कम करण्याची. उगाच मोठमोठ्या गप्पा मारून काहीच साध्य होणार नाही.
                                                आपल्या प्रवासाची दिशा अगदी साधी आहे. आज आपण मराठी भाषिक ब्राम्हण एकत्र येतो आहे. आपल्या विचार मंथनातून आपली एक वैचारिक बैठक तयार होईल, आपल्यातले मतभेद एकत्र विचार करून आपल्याला सोडवता येतील, एकदा आपला पाया तयार झाला कि इतर भाषिक ब्राम्हण आपल्यात सामील करून घेता येतील आणि अशीच हि चळवळ पुढे इतर जातीत, इतर राज्यात नेता येईल. असा हिंदू, जो जाती-पाती, पंथ हे बाजूला सारून एक झाला कि मग हळूहळू  इतर धर्मही आपल्याला सामील करता येईल त्यातून एकात्मिक भारत साकार होईल. हा कदाचित माझा कल्पनाविलास किंवा स्वप्नरंजन  वाटेल, पण मला आशा आहे कि, आजचा जगाचा वेग बघता हे लवकर साध्य होऊ शकते.आणि ह्याला वेळ लागेल हे मान्य केले तरी, कधीतरी तर सुरवात करावीच लागेल. मग आताच का नाही ?
                                                "ब्राम्हण एकता " हि आज संकुचित वाटत असली तरी भविष्याचा विचार करता एक सुरवात म्हणून योग्य वाटते. पूर्वी मनुने चार वर्ण सांगितले होते, त्यात ब्राम्हण हे उच्च स्थानावर होते, पण आज आपण जी भविष्याची पायाभरणी करतो आहोत त्यात आपण आपल्याकडे सगळ्यात खालचे स्थान घेतो आहोत. राष्ट्रीय एकतेची जी  "दहीहंडी"  आपल्याला हस्तगत करायची आहे त्यात सगळ्यात वर कोण राहील ? हे महत्वाचे नाही, तर आपण,जो सगळ्यात खालचा थर आहे, तो भक्कम झाला पाहिजे.
सगळ्यात खालचा भक्कम थर हा मराठी ब्राम्हणांचा, त्या नंतर इतर ब्राम्हण, त्यावर संपूर्ण मराठी लोकं, असे  एक एक थर लावत गेलो तर राष्ट्रीय एकतेची आज खूप उंच वाटणारी दहीहंडी नक्कीच फुटेल असा विश्वास वाटतो. 
                                               मला वाटतं कि आता मांसाहार,शाकाहार हे प्रश्न उपस्थित होणार नाही. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत आहे. ब्राम्हण एकता ह्या ग्रुपचा ह्या मताशी सहमती असेलच असे नाही. "ब्राम्हण एकता" हा ग्रुप एक सामाजिक, सांकृतिक चळवळ आहे, त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. कृपया माझ्या वैयक्तिक मताशी ब्राम्हण एकता ग्रुपला जोडू नये हि विनंती. धन्यवाद !!!

ब्राम्हण एकता हवी का ?

                              मला असा प्रश्न विचारण्यात आला कि ब्राम्हण हे बुद्धीबलानी, गुणांनी आधीच समोर आहेत, मग  त्यांना संघटीत होण्यची गरज काय? व्यक्तिश: मला आतापर्यंत तरी मी ब्राम्हण आहे म्हणून कोणताही वाईट अनुभव आलेला नाही. पण समाजाचा एक घटक म्हणून विचार करताना आपण संघटीत होण्याची गरज वाटते. फक्त दोन-तीन  क्षेत्रांचे उदाहरणे देतो नाही तर हा विषय तसा खूप मोठा आहे.
                                बँकिंग ह्या क्षेत्रात ब्राम्हण हा अविभाज्य घटक आहे. अनेक बँकेच्या क्लार्क ते संचालक मंडळापर्यंत ब्राम्हणांची मक्क्तेदारी राहिलेली आहे. विक्रम पंडितनी सिटी बँक परत एकदा शिखरावर नेली, पण आपली अशी म्हणून एकही बँक नाही, सारस्वत बँक, कुणबी बँक अश्या अनेक बँक असताना एकही "ब्राम्हण बँक" नाही. आपण आपल्यातला कुणाला पुढे करत नाही, ज्यानी-त्यानी स्व:तचे बघावे, असा आपला विचार असतो. आज बँकिंग क्षेत्रातही आपण अल्पसंख्य होत चाललो आहे.
                                   शिक्षण क्षेत्र हे आधी ब्राम्हणांचे मानले जायचे. प्रशाशकिय  सेवांमध्ये ब्राम्हण बरेच पुढे होते. आज शिक्षण क्षेत्रात आपले स्थान शोधावे लागते. प्रशाशकिय सेवांमध्ये जवळपास हद्दपार झालो आहोत. सरकारी असो नाही तर खाजगी ब्राम्हण म्हणून आपला पूर्वीचा दबदबा राहिलेला नाही. माहिती-तंत्रद्यान क्षेत्राचीही तीच गत आहे, आपण त्यात मागे नाही पण आपला दबदबाही नाही.
                                     सहकार क्षेत्र  हे पूर्वीपासूनच मराठा समाजाचे आहे आणि ते अजूनही टिकून आहे. त्या मागे त्यांची एकता आहे. वैचारिक, राजकीय मतभेद असले तरी सहकाराचा विषय येतो तेंव्हा ते एक असतात.
                                       सगळ्यात महत्वाचे क्षेत्र, राजकारण. राजकारणात आज आपले स्थान काय ? बरेच जण म्हणतील तो आपला प्रांत नाही. पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे कि तुमची राजकीय ताकत नसेल तर तुमची किंमत शून्य आहे. आज फक्त ओबीसी हा एकच निकष लावून कोणीही संपूर्ण पक्ष वेठीला धरू शकतो. ओबीसी, दलित, मुस्लीम नेत्यांना राजकारणात किंमत आहे ती त्यांच्यातल्या एकतेमुळे. आज जातीआधारित आरक्षण नको, आर्थिक निकष लावावे, असे आपल्यातल्या अनेकांना वाटत असेल पण एकत्रित आवाज उठवत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याकडे लक्ष देणार नाही, कारण मतांच्या राजकारणात, संख्या लागते, बुद्धीबळ नाही, किंवा गुणही नाही. मतं किती ? त्यावर तुमचा विचार होतो. आज राजकारणात आपण कुठे आहोत ? मनोहर जोशी, नितीन गडकरी असे काही नावं सोडली तर कोणीच नाही. कम्युनिस्ट पार्टीत मृणाल गोरे नंतर कोणतंच नाव दिसत नाही. विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर काँग्रेसमधेही शुकशुकाट आहे.
                                  आज आपण सर्व क्षेत्रात एक व्यक्ती म्हणून समोर आहोत, पण एक समाज म्हणून खूप मागे आहोत. आपण सगळे स्व:तच्या कोशात आहोत, आपल्या बाहेर काय सुरु आहे ? त्याकडे आपले लक्ष नाही. अनेक गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन सारखा आहे, अनेक बाबींवर आपल्या मनातला आवाज सारखा आहे, अनेक घटनांवर आपले मत एक आहे, पण हे फक्त स्व:त पुरतं  मर्यादित आहे. आपण एक झालो तर आपल्या आतला हुंकार, एक बुलंद नारा होईल. आज गरज आहे ती बुलंद आवाजाची, मनातच कोंडणारा विचार नको. आपल्यातला निखारा, ज्वाला होऊन प्रज्वलित व्हायला आपण संघटीत होणे ही आजची गरज आहे.
                                      आपल्याला संघटीत व्हायचे आहे ते कुणाला विरोध म्हणून नाही तर कुणाचा विरोध आपल्याला होऊ नये म्हणून. आपली एकजूटता आपल्याला दाखवायची आहे ती कोणता फायदा घ्यायला नाही तर कोणी आपला गैरफायदा घेऊ नये म्हणून. आपण एक व्यक्ती म्हणून नक्कीच यशस्वी आहोत, पण आता एक समाज म्हणून यशस्वी व्हायचे आहे. ते साध्य करायला आपल्याला संघटीत होणे गरजेचे आहे.                             एकदा समाज म्हणून संघटीत झालो कि एक देश म्हणून संघटीत होणे अधिक सोपे होईल.

Monday, 13 June 2011

युवक आणि राजकारण

                          भारताची आजची आंतरराष्ट्रीय प्रतिमा काय आहे ? भ्रष्ट राजकारणी, मुजोर नोकरशाही, संपूर्ण यंत्रणेतील बेबंदशाही , ढिसाळपणा, अतिरेक्यांचा धुडगूस , नक्षल्यांचा वाढता धोका, सीमेवर अशांतता, वाढती महागाई ,शिक्षणाचा बाजार आणि हे निमुटपणे सहन करणारी जनता.
                           दरवेळी असे प्रश्न चर्चेला येतात तेव्हा एक मुद्दा ठळकपणे जाणवतो कि, आजचा तरुण ह्या पासून अलिप्त का आहे ?, त्याला ह्या गोष्टींशी काहीच देणं-घेणं नाही का ? आजचा युवक फक्त स्व:तचा विचार करतो. माझे शिक्षण, माझे करीयर, माझे कुटुंब (तेही बायको आणि मुलं), स्व:तची आर्थिक आणि भौतिक प्रगती ह्यापलीकडे तो विचार करत नाही.प्रत्येकजण आपल्यातच मश्गुल आहे. प्रत्येक मुद्द्यावर तरुणाईचे उत्तर ठरलेले आहे, हे असेच चालणार, आपण काही करू शकत नाही, ह्या देशाला देवच वाचवू  शकतो वगैरे. पण खरंच असे आहे का ? माझे मत वेगळे आहे. आजचा युवक खूप हुशार आहे. सामाजिक जाणीव त्यालाही आहे. पण त्याला गरज आहे एका विचाराची, एका नेत्याची, मार्गदर्शनाची. अण्णा हजारेंना जो तरुणांचा पाठींबा मिळाला तो हेच दर्शवतो.
                              आज अभाविप, एनएसयुआई, विद्यार्थीसेना ह्या सगळ्या थंड बस्त्यात गेल्या आहेत.कॉलेज, विद्यापीठ निवडणुका बंद झाल्या तश्या विद्यार्थी चळवळी हि बंद झाल्या. राजकीय नेत्यांनी विद्यार्थी संगठना आपल्या स्व:तच्या शक्ती-प्रदर्शनासाठी वापरणे सुरु केले. इतक्यातला भूतकाळ बघितला तर एकही विद्यार्थी चळवळ आठवत नाही. आज सगळ्या संगठना पक्षीय भांडणासाठीच वापरल्या जातात आहेत. राजकीय पक्षांनी विद्यार्थी संगठना आपल्या दबावगटात बदलून टाकल्या. आज सगळ्या प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते हे विद्यार्थी चळवळीतून आलेले आहेत पण एकाही नेत्याचे ह्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. एकाही नेत्यानी युवा नेत्तृत्व तयार करण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्यात भर म्हणजे आजची भ्रष्ट राजकीय परिस्थिती, ह्यात गुण असूनही सामान्य युवक नेता होऊ शकत नाही. तारुण्याचा उमेदीचा काळ सतरंज्या उचलण्यात, दुकाने बंद करण्यात, बसेस जाळण्यात वाया घालवण्यापेक्षा  तो आपला मार्ग शोधतो आणि सुरक्षित आयुष्य जगतो त्यात त्याचे काय चुकले? नेत्याचा मुलगा किंवा मुलगी पुढचे नेते असतील तर तरुणांनी कोणत्या महत्वकान्क्षेनी राजकारणात यावे? घराणेशाहीचा आरोप झाल्यावर एक उत्तर ठरलेले असते, कि डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा इंजिनिअर मग नेत्याचा मुलगा नेता का होऊ शकत नाही? मुद्दा बरोबर आहे, पण डॉक्टर, इंजिनिअरचे मुले तेच होतात ते त्याच्या गुणांमुळे, बापाच्या कृपेनी नाही. नेत्याच्या मुलात किवा मुलीत तसे गुण आहेत का? हे पक्ष बघतात का? कि मुलांना संधी देताना त्यांची लायकी बघण्यापेक्षा त्यांच्या बापाचे उपद्रवमूल्य बघितल्या जाते? गटा-तटाचे राजकारण, जातीय समीकरण, आर्थिक गणित, ह्यामुळे सामान्य युवक नेता होऊ शकत नाही.
                              ह्यातून मला एक मार्ग दिसतो, तो म्हणजे कॉलेज, विद्यापीठ निवडणुका पुन्हा सुरु करणे. ह्यावर आक्षेप येईल कि आधी पैसा, अपहरण, खून, मारामारी ह्यासारख्या गैरप्रकारांमुळे ह्या निवडणुका बंद केल्या मग आता परत हे सुरु करायचे का? मला वाटत कि करायला हवे. आताच्या पिढीला हा अनुभव घेवू द्यावा. ह्यामुळे त्यांच्यातली सामाजिक,राजकीय विचारशक्ती वाढेल. निवडणुका, विद्यार्थी चळवळ ह्यातून त्यांचे विचार तयार होतील. स्व:ततील नेत्तृव गुण ओळखता येतील. युवा नेत्तृवाची उणीव काही प्रमाणात भरून निघेल. आणखी एक महत्वाचे कि आज राजकीय नेत्यांना त्यांच्या मुलांना समोर करायला जे कारण आहे कि दुसरे कोणी नाही म्हणून आमचे मुलं, ह्यालाही लगाम बसेल. गैरप्रकार होतील म्हणून निवडणुकीवर सरसकट बंदी योग्य वाटत नाही. युवकांनी करीयर म्हणून राजकारणाचा विचार करावा असे आपण म्हणतो, पण त्यांनी ह्याचा कधी अनुभव घेतला नाही तर ते इकडे कसे येतील? आजचा तरुण हुशार आहे, तो ह्या गैरप्रकारांना भिक न घालता पुढे जाऊ शकतो, फक्त त्यांना मार्ग दाखवायची गरज आहे. कॉलेज, विद्यापीठ निवडणुका पुन्हा सुरु कराव्यात, युवाशक्तीचे चैतन्य पहा पुन्हा बहरेल.

Thursday, 2 June 2011

हिंदू आणि मी

                          माझा  फेसबुकवरचा   profile बघून  अनेकांनी  विचारले कि मी त्यात  "Hindu" का लिहिले नाही ?  "Humanism" का लिहिले ?
                           मला  वाटत कि  माझा  धार्मिक  दृष्टीकोन  मानवता  आहे ." " हिंदू "   हा   शब्द , त्याचा  अर्थ खूप व्यापक आहे. हिंदू  हि एक संस्कृती आहे, सभ्यता आहे. हिंदू  हा  धर्म  नाहीतर  एक जीवनपद्धती आहे. "हिंदू" ह्या एका शब्दातच " सर्वसमावेशकता " आहे. सर्वांना त्यांच्या भल्या-बुऱ्या गुणांसह सामाऊन घेणे हे "हिंदू" मध्ये अभिप्रेत आहे. आणि मला वाटत कि, माझा दृष्टीकोन एव्हढा व्यापक नाहीये. "मानवता" हि "हिंदुत्वात " सामावली आहे.
                             "हिंदुत्वातला" एक अल्प अंश  "   मानवता" तीही  (थोडीफार) माझ्यात आहे, सर्वसमावेशकता  माझ्यात  नाही, म्हणून  मी तसे  नमूद  केले.
                                 मी "हिंदुत्वाचा" अभ्यासक नाही , मला जेव्हढे कळले ते नमूद केले. जाणकारांनी मार्गदर्शन करावे. 

Tuesday, 31 May 2011

मनोगत

                                मी BLOG लिहिणे सुरु केले,ह्याचा अर्थ असा नाही कि मी खूप मोठा माणूस आहे,माझे लिखाण बरेच लोक वाचतील.माझा उद्देश नवीन काहीतरी शिकणे आणि करणे एवढाच आहे.
                                मुळात मी सिविल ENGG माझा संबंध वाळू,सिमेंट,विटा ह्यांच्याशी. कॉम्पुटर, त्याचे सोफ्टवेअर हे मला नवीन आहे.त्यात मधला काळ व्यसनात गेल्यानंतर परत उभारी घेताना नवीन गोष्टींकडे काळ वाढला त्यातून हा प्रयत्न. तसा e-diary हा एक पर्याय होता पण त्यात नाविन्य नव्हते.शेअरिंग आणि नाविन्य हयात मला Blog हा पर्याय निवडला. हे कोणी वाचावे  किंवा comment करावी हि अपेक्षा नाही.
                                 सहा महिन्याआधी मी कॉम्पुटरला हात लावायला घाबरत होतो. मेल चेक करायचे असतील,किंवा पाठवायचे असतील तर अर्पिताची मदत घ्यावी लागायची. बरेचदा net कॅफे मधल्या मुलाला सांगून काम करून घेत होतो. पण आता हळूहळू आत्मविश्वास वाढतो आहे.
                                   आज खूप आनंद होतो आहे कि मी blog तयार करू शकलो आणि post पण करू शकलो. 
    जाणकारांनी मार्गदर्शन केले तर आनंद होईल.                            
धन्यवाद!!!!