नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निकालांचा आढावा घेताना पुणे महापालिकेतील काही गोष्टी प्रामुख्यानी जाणवतात. जी राष्ट्रवादी कॉंगेस पार्टी, कॉंग्रेस(आय) मधील नेतृत्वाची पोकळी भरुन काढुन एकहाती सत्ता मिळवण्याची दावा करत होती, त्यांना दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण जड गेले आणि परिपुर्ण यशानी त्यांना हुलकावणी दिली. ज्यांच्या कार्यकाळात हे घडले, ते मोहनसिंह राजपाल सपशेल पराभुत झाले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानी केलेल्या जाहीर आवाहनाला पुणेकरांनी मनापासुन प्रतिसाद देत श्री.राजपाल यांना मोठ्या फरकानी पराभुत केले, त्याबद्द्ल पुणेकरांचे आभार ! सर्वच पक्षांना यातुन योग्य तो संदेश गेलाच असेल. यापुढे ब्राह्मणविरोधी कारस्थाने कराल तर तुम्हालाही घरी बसवु, हा इशाराच मतदारांनी दिला. दुसरी महत्वाची गोष्ट, जे स्वःतला ब्राह्मण नेते मानतात त्यांनाही पराभुत केले. आपण काहीही केले तरी समाज ते मान्यच करेल, हा भ्रमाचा भोपळा फुटला. मतदारांनी ‘‘आपल्याला कोणीही गृहीत धरु नये’’, हाच संदेश यातुन दिला. जे ब्राह्मण नेते घराणेशाही रुजवु पहात होते तर कोणी पक्षविरोधी भुमिका घेत ब्राह्मण मतदारांना गृहीत धरुन आपली वेगळी चुल मांडण्याच्या प्रयत्नात होते त्यांनाही मतदारांनी दणका दिला. या निकालांकडे अनपेक्षित निकाल या दृष्टीकोनातुन न बघता सकारामत्क दृष्टीने बघितले पाहिजे. ब्राह्मण मतदारांनी आपले पुर्वमत बाजुला ठेवत अधिक व्यावहारिकपणे मतदान केले, पण मतदानाची अत्यल्प टक्केवारी मात्र अजुनही चिंतेचा विषय आहे. आपल्या मतानी काय घडु शकते हे आता लक्षात आल्यानंतर आता पुढील काळात मतदानाची टक्केवारी वाढवण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे ब्राह्मण मतदारांनी लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपुर्ण राज्यात जो भरभरुन पाठींबा मिळाला विशेषःत युवा वर्गाचा, त्यातुन जनतेला बदल हवा आहे, हेच अधोरेखित होते. विद्यमान राजकीय पक्षांमधे मतदारांना काही उणीव भासते आहे, काही तरी कमतरता भासते आहे. ती उणीव, ती कमतरता मनसेच्या माध्यमातुन भरुन निघेल अशी आशा मतदारांना वाटली. आजच्या युवकाला प्रचलित व्यवस्थेविषयी चीड आहे, नाराजी आहे. त्याला बदल हवा आहे. कोणत्याही नेत्यापेक्षा तो बदल घडवुन आणण्याची क्षमता त्याला राज ठाकरेंमधे दिसली, असेच या निकालांवरुन दिसते. तरुण वर्गात जसा ‘मनसे फॅटर’ चालला त्याचप्रमाणे ब्राह्मण मतदारांमधेही चालला. पुणे येथील आपल्या जाहीर भाषणात राज ठाकरेंनी दादोजी पुतळा प्रकरणावर आपल्या शैलीत प्रखर टिका केली आणि त्याचा परिणाम म्हणुन ब्राह्मण मतदारांनी भरभरुन आपले मत मनसेच्या पारड्यात टाकले. या निकालात ब्राह्मण मतदार मनसेकडे झुकल्याचे चांगलेच लक्षात येते. यातुन सर्व पक्षांनी योग्य तो बोध घ्यायला हवा. महाराष्ट्रात पार पडलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकींकडे सर्वच राजकीय पक्ष 2014 साली होणार्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणुन बघत होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने या निवडणुकींमधे समाजबांधवांना अधिकाधिक उमेदवारी मिळावी, समाजबांधव राजकीय क्षेत्रात सक्रीय व्हावा, यासाठी सर्वच प्रमुख पक्षांशी संपर्क करुन या मागणीचा सातत्यानी पाठपुरावा केला. तसेच अधिकाधिक उमेदवार निवडुन यावेत यासाठीही प्रयत्न करण्यात आले.मुंबई महापालिकेत तसेच ठाणे महापालिकेत सर्व पक्षांनी मिळुन सरासरी 5 टक्केच उमेदवार दिले त्यापैकी 50 टक्के निवडुन आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसनी, शिवसेनेचे एकमेव ब्राह्मण खासदार आनंद परांजपे यांना आपल्याकडे वळविल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आता अधिकाधिक ब्राह्मण कार्यक्रत्यांना उमेदवारी देईल, ही आशा फोल ठरली.
जवळपास सर्वच राजकीय पक्ष जातीय समीकरणांवर, त्या आधारावर उमेदवारी घोषित करुन, ‘‘समाज तोड आणि मत जोड’’, त्या तत्वानुसार व्यवहार करत असुनही स्वःतला ‘सेक्युलर’ म्हणवुन घेतात. या तत्वाला केवळ शिवसेना व मनसे आजही अपवाद दिसतात. पुणे महापालिकेत कॉंग्रेस(आय)ने केवळ दोन ब्राह्मण उमेदवार दिले पण त्यांनाही निवडुन आणण्यात कॉंग्रेसला यश मिळाले नाही. राष्ट्रवादी पार्टीचे जन्मस्थान असलेल्या पुण्यात पार्टीने 4 उमेदवार देऊन ब्राह्मण समाजाला जवळ करत असल्याचे चित्र ऊभे केले पण एकही उमेदवार निवडुन आणु शकले नाही. पुण्यातील एक ब्राह्मण नेते श्री.मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या धर्मपत्नी सौ. एश्वर्या घैसास यांना उमेदवारी देऊन ब्राह्मण समाजाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मणबाहुल्य असलेल्या वेदभवन (बेचाळीस हजार मतदारांपैकी बावीस हजार ब्राह्मण) प्रभागात सौ.घैसास यांना मतदारांनी नाकारले पण त्याचवेळी त्याच प्रभागातील पुरुष उमेदवार राष्ट्रवादीचेच श्री.बंडु केमसे यांना मात्र त्याच मतदारांनी निवडुन दिले. या प्रभागातील निकाल संपुर्ण राज्यातले मॉडेल ठरेल. भारतीय जनता पार्टीने 9 उमेदवार दिले त्यातील 5 निवडुन आले. मनसेनी 5 उमेदवार दिले त्यातील 2 निवडुन आले तर शिवसेनेने 2 उमेदवार दिले त्यातील 1 निवडुन आला. एकुणच मागील सदनातील 11 सदस्यांवरुन यंदा ब्राह्मण सदस्यांची संख्या 8 वर घसरली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत कॉंग्रेस(आय)ने 3 उमेदवार दिले, ते सर्वच पराभुत झाले. राष्ट्रवादी पार्टीने 2 उमेदवार दिले ते 2 ही निवडुन आले. शिवसेनेने 1 उमेदवार दिला पण तो पराभुत झाला. भारतीय जनता पार्टीने 1 उमेदवार दिला तो निवडुन आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 4 उमेदवार दिले त्यापैकी 1 निवडुन आला. मागील टर्मला 3 ब्राह्मण सदस्य होते, ते आता चार झाले.
इतर शहरातील महापालिकांमधेही साधारण असेच चित्र आहे. सर्वच पक्षांनी जेमतेम 5 ते 6 टक्के ब्राह्मण उमेदवार दिले, त्यापैकी 50 टक्के निवडुन आले. या निवडणुकीत ब्राह्मण मतदारांनी चांगल्या प्रमाणात मतदान केले ही त्यातला त्यात समाधानाची बाब आहे.
समाजबांधवांचा राजकारणात समावेश करणे तसेच त्यांना सक्रीय करणे यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नेहमीच प्रयत्नशील राहील व या क्षेत्रात आपला प्रभावशाली गट निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.
