Monday, 15 October 2018

किशोर वयात येताना

टीन एजर मुलांमधे सातत्याने एक समस्या निरिक्षणात येते. ब-याच मुलांना आपल्याला भविष्यात नेमके करायचे काय ? हा मोठा प्रश्न असतो. तर, काही मुलांनी आपल्याला काय कराय्चे हे ठरविलेले असते. मात्र, आपले ध्येय साध्य कसे करायचे याची मात्र त्यांना कल्पना नसते. आपल्याला इंजिनिअरिंग करायचे आहे, क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे आहे, कला क्षेत्रात काम करायचे आहे. मात्र, याला केवळ स्वप्नरंजन म्हणता येईल कारण हे ध्येय साध्य करण्यासाठी नेमके काय करायचे, किती कष्ट घ्यावे लागतील, कोणत्या मार्गाने गेल्यास ध्येय साधता येईल याचा काहीही विचार केलेला नसतो. ध्येय निश्चित आहे मात्र ध्येयसिध्दीचा मार्ग मात्र माहीती नसतो. याचा परिणाम म्हणजे ऐन करिअरच्या वयात मुलांचा गोंधळ होतो. आता नेमके करायचे काय ? 
हा प्रश्न उभा राहतो. मग मिळेल ते, समोर आलेले जे काही काम आले त्याचा नाईलाजाने स्विकार करून, मन मारुन मिळेल ते काम करावे लागेल. अशा कामात मुलांना समाधान, आनंद मिळत नाही तरी देखील दुसरा पर्याय नाही म्हणून काम करत राहतात आणि मुले नैराश्यात जातात प्रसंगी व्यसनांच्या आहारी जातात व आयुष्याची फरपट होते.
इथे पालकांची भुमिका सुरू होते. साधारणपणे मुले 8वी/9वी ला गेले की एकदा शांतपणे मुलांशी करिअर या विषयावर चर्चा करायला हवी. मुलांना ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे मग ते अभियांत्रिकी, क्रिडा, कला असे कोणतेही क्षेत्र असो ते ध्येय साध्य करण्यासाठी काय काय करावे लागेल, काय अडचणी येवु शकतात, नेमकी किती मेहनत घ्यावी लागेल, त्या त्या क्षेत्रात भविष्याततील संधी काय असेल, अडचणी काय असतील यावर सविस्तर चर्चा करावी. त्याचसोबत ‘प्लान बी’ म्हणजे हे ध्येय साध्य करण्यात अडचण आलीच तर त्याच वेळी तज्ञांचा सल्ला घ्यावा. तरी देखील अडचण आलीच तर दुसरा कोणता पर्याय उपलब्ध असेल, दुसरे कोणते करिअर करता येईल याचादेखील तज्ञांशी विचारविनीमय करून तशी मानसिक तयारी ठेवावी लागेल. टीन एजर मुलांच्या पालकांनी हे केले तर भविष्यात मुलांना येणारे नैराश्य व त्यामधुन येणारी व्यसनाधिनता याला निश्चितपणे आळा घालता येईल.
अमोघ टेंभेकर
हेल्प रिकव्हरी होम, पुणे
9823637232