ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून
ब्रिटिशांनी हिंदुस्थानात शिरकाव केला. ब्रिटिशांची धुर्त आणि चाणाक्ष नजर
हिंदुस्थानातील सर्व स्थिती न्याहाळत होती, त्याचे विश्लेषण केले जात होते.
हिंदुस्थान गिळंकृत करण्याच्या आपल्या ध्येयावर त्यांची टप्प्याटप्प्यानी
काळजीपूर्वक वाटचाल सुरू होती. हिंदुस्थानचा राजकीय, सामाजिक तसेच भौगोलिक अभ्यास
करताना धुर्त ब्रिटिशांनी एक बाब नेमकी हेरली. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असा
चौफेर पसरलेल्या या विस्तिर्ण प्रदेशात वेगवेगळे राजे राज्य करीत आहेत. प्रत्येक
प्रदेशाच्या चालीरिती, परंपरा, भाषा, खाद्य वेगवेगळे असूनही एक समान धागा आहे तो
म्हणजे यांचा हिंदु धर्म. हिंदु धर्म या प्रदेशात अतिशय घट्टपणे रोवला गेला आहे
आणि या धर्मात ब्राह्मण वर्गाला अतिशय सन्मानाचे स्थान आहे. राजापेक्षा जास्त मान
हा राजपुरोहितांना आहे. कावेबाज ब्रिटिशांनी पुर्णपणे ओळखले की, या देशात जर शिरकाव
करायचा असेल तर ही एकजुटतेची अभेद्य भिंत उध्वस्त करणे अत्यावश्यक आहे. आपली
जगप्रसिध्द (?) ‘फोडा आणि झोडा’ ही कुटनिती वापरून त्यांनी ब्राह्मण वर्गाला
लक्ष्य केले. सर्वप्रथम त्यांनी वेद- पुराणे यांच्या सत्यतेविषयी जनमानस कलुषित
केले. वेदांना वैज्ञानिक आधार नाही, हे थोतांड आहे हे जनतेच्या मनावर बिंबवुन
त्याविषयी संभ्रमाचे वातावरण तयार केले. स्पृश्य-अस्पृश्य भेद हा ब्राह्मणांनी
सुरू केला, ब्राह्मण हे ब्राह्मणेतरांना विद्यादान करीत नाहीत, स्त्री शिक्षणाला
ब्राह्मणांचा विरोध आहे, इत्यादी. अशा बिनबुडाचे आरोप करीत त्यांनी
ब्राह्मण-ब्राह्मणेतर फूट पाडण्यात यश मिळवले. वास्तविक, ब्रिटीश अधिकार्यांनी (सर
थॉमस मन्रो, मद्रास आणि डब्लु. ऍडम्स्, बंगाल) सादर केलेल्या 1822 -25 या अहवालात
स्पष्टपणे नमुद केले आहे की, हिंदुस्थानातील साक्षरता 90.09 टक्के इतकी प्रचंड
असून यात सर्व समाज घटकांचा समावेश आहे. यात शुद्रांची टक्केवारी 45 टक्के इतकी
स्प्ष्टपणे नमुद करण्यात आलेली आहे. 95 टक्के खेड्यांमधे शाळा आहेत, हे पण आर्वजुन
नमुद केलेले आहे. ही वास्तविकता असताना केवळ ब्राह्मणांना इतर समाजापासून
तोडण्याकरीता ब्रिटिशांनी केलेला बुध्दीभेद, दुर्दैवानी आज मात्र सर्वमान्य झाला
आहे. शिवछत्रपतींच्या सैन्यात जशा अठरा पगड जातींचा समावेश होता, तसाच
पेशव्यांच्या सैन्यात देखील होता. जुने वाङ्मय बघितले तर जात्यावरची गाणी,
भुलाबाईची गाणी, ओव्या असे असंख्य काव्यप्रकार हे महिलांनी केलेले आढळते. ते काय
शिक्षण न घेताच ? काही बखरीत उल्लेख आढळतो की, सरदार स्त्रिया या दफ्तराचे हिशेब
ठेवीत. ते काय शिक्षणाशिवाय ? ब्रिटिशांच्या आगमनाच्या काळात असलेले 90.09 टक्के
असलेले साक्षरतेचे प्रमाण, ब्रिटिश गेले त्यावेळी 19 टक्के इतके खालावले होते. मग
या निरक्षरतेला जबाबदार कोण ? ब्रिटिश की ब्राह्मण ? लॉर्ड मॅकोलेने या सर्व बाबी
आपल्या शैक्षणिक धोरणातून अशा आक्रमकपणे हिंदुस्थानातील समाजमनावर बिंबवल्या की,
सुशिक्षित ब्राह्मण ही तेच सत्य मानु लागला. वारंवार तेच तेच बिंबवल्यामुळे
ब्राह्मणेतर समाज ब्राह्मणांना आपला शत्रु मानु लागला.
कालांतराने, ब्रिटीश राजवट स्थिरावल्यानंतर
हिंदुस्थानात सामाजिक सुधारणेचे वारे वाहु लागले. अनिष्ट रूढी परंपरा यांच्या
विरोधात प्रचंड चळवळ उभी राहु लागली. पण, दुर्दैवानी ही चळवळ, रूढी परंपरा विरोधी
न राहता ब्राह्मणविरोधी होऊ लागली. या अनिष्ट रूढी परंपरांचा आडोसा घेत
ब्राह्मणांना लक्ष्य केले जाऊ लागले. ब्राह्मण विरूध्द ब्राह्मणेतर वाद वाढु
लागला. ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यात दरी वाढत गेली, ब्राह्मणांविषयी
ब्राह्मणेतर समाजात असंतोष खदखदु लागला. ब्रिटिश कुटनिती यशस्वी झाली. गांधी
हत्येनंतर या असंषोतानी उग्र रूप धारण केले. असंख्य ब्राह्मण मारले गेले, लुटले
गेले, देशोधडीला लागले. ग्रामीण भागातून तर ब्राह्मण हद्दपारच झाला. मुळातच शांत,
सहनशील असणारा ब्राह्मण यातूनही सावरला व पून्हा एकदा सुस्थितीत येवु लागला. ‘आपण
बरे नी आपले काम बरे’, या मार्गाने जगु लागला. या सर्व पार्श्वभूमीवर
ब्राह्मणांच्या मानसिकतेमधे निर्माण झाला ‘‘आपण ब्राह्मण आहोत’’ याचा न्युनगंड. आणि
याच न्युनगंडातून निर्माण झाला तो ‘‘संस्कारांचा गोंधळ’’.
वैदिक परंपरेचा वारसा लाभलेला ब्राह्मण वर्ग
मुळात शांत स्वभावाचा आहे. आक्रमकता असते ती केवळ बौध्दिक वाद विवादात. सोशीक,
सहनशील असलेला हा वर्ग सामाजिकदृष्ट्या माघारला गेल्यानंतर याच्यात एक प्रकारची
भयाची भावना निर्माण झाली. घरातून संस्कार मिळत असतात, कोणाला मारू नये, कोणी आपली
खोड काढली तर त्याची समजूत काढावी वा त्याकडे र्दुलक्ष्य करावे, कोणाशी उध्द्दटपणे
बोलु नये, सर्वांचा योग्य तो मान ठेवावा. परंतू, या संस्कारांना ब्राह्मणेतर समाज
घाबरटपणा समजू लागला. ब्राह्मणांची कितीही टिंगलटवाळी केली तरी आपले काही बिघडत
नाही, या मग्रुरीतून ब्राह्मणांना त्रास देण्याचे प्रकार वाढले. शाळेतील मुलांना
अशा टवाळखोरी तोंड देणे नित्याची बाब बनली. एकीकडे ‘‘ए बामना’’, ‘‘ए कढीभात’’ अशी
संभावना सहन करावी लागते, तर दुसरीकडे घरातील संस्कार यांना प्रत्युत्तर देण्यास
नाकारते, अशा कैचीत ब्राह्मण सापडला. कालौघातील बदलते सामाजिक, आर्थिक बदलही
लक्षात घ्यावे लागतील. गांधी हत्येनंतर ब्राह्मण बहुतांश शहरात स्थिरावला. मुख्यतः
नोकरी हेच उत्पनाचे साधन. शहरांमधून राहताना हळुहळु उंचावत जाणारे जीवनमान, बदलती
जीवनशैली, त्यातून जागेची अडचण अशा समस्यांमूळे एकत्र कुटुंब विभक्त होवु लागली.
अपूरे उत्पन्न, वाढती महागाई, स्पर्धात्मक जीवन व त्याला तोंड देण्यासाठी मुलांना
द्यावे लागणारे महागडे शिक्षण यामुळे नवरा-बायको या दोघांनाही नोकरी करणे भाग
पडते. मुलांचे व्यवस्थित संगोपन व्हावे या उद्देशानी काटेकोरपणे केलेले कुटुंब
नियोजन, विभक्त कुटुंब यामुळे मुलांना ऐकटेपणा यायला लागला. दिवसभर शैक्षणिक मारा
तर संध्याकाळी संस्कार वर्ग, छंद वर्ग यातच तो गुरफटला गेला. मित्र मंडळात जाणे,
एखाद्या मंडळाचा सभासद होणे, काही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे, याला पालक
आक्षेप घेतात. मुलगा बिघडेल, तो बाहेर मारामारी करेल, अशा असंख्य समजूतीमधून पालक
मुलांना घरातच गुंतवून ठेवतात. ना मित्र, ना बहीण भाऊ, असे मुलं आपल्याच कोशात
गुंतत जातात. एक अथवा दोन अपत्ये असल्यामुळे त्यांचे सर्व लाड पूर्ण करणे, म्हणजे
आपले कर्तव्य आहे या (गैर) समजूतीतून पालक मुलांचे सर्व हट्ट पूर्ण करीत असतात.
मुलांना तडजोड या प्रकाराची ओळखच होत नाही. तसेच, घरात वडीलधारी मंडळी नसल्यामुळे
आपोआप होणार संस्कार मिळणे थांबले. मुलांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्यानी आपले
कर्तव्य संपले, या समाधानात पालक राहू लागले. घरातील एकटेपणा, पुरवले जाणारे सर्व
हट्ट, त्यामुळे तडजोड करण्याची मानसिकता नसलेला हा मुलगा / मुलगी तरूणपणी बाहेरील
जगात प्रवेश करतो त्यावेळी त्याच्यात बाहेरील जगाशी संघर्ष करण्याची करण्याचा
मानसिक कणखरपणा नसतो, तर मनात असतात ते घरात पालकांनी दिलेले संस्कारांचे अर्धवट
धडे, तसेच, मी म्हणेन ते होईलच ही ठाम (?) समजूत. पण बाहेरील परिस्थिती काय असते ?
गांधी हत्येनंतर पराकोटीला गेलेला
ब्राह्मणव्देष काही प्रमाणात निवळला गेला. जातीपातीच्या सीमारेषा धूसर होत होत्या,
जातीय व्देष निवळत होता. त्याच काळात व्हि.पी.सिंह यांनी भारतीय जनता पक्षाच्या
हिंदु कार्डला धक्का देण्यासाठी भयंकर राजकीय खेळी खेळली. मंडल आयोग अहवालाचे
जवळपास विस्मृतीत गेलेले प्रकरण त्यांनी पक्षीय, राजकीय स्वार्थासाठी पुन्हा उकरून
काढले. आरक्षणाच्या मुद्यावरून जातीपातींमधील व्देषाचे भूत हिंदुस्थानी जनतेच्या
मानगुटीवर पुन्हा एकदा बसवले. विसरत
चाललेल्या जातींच्या अस्मिता (?) पुन्हा जागृत झाल्या. आणि सुरू झाला जातींच्या
राजकारणाचे भयानक पर्व. तारूण्यापर्यंत घरातल्या सुरक्षित वातावरणात वाढलेला
ब्राह्मण तरूण या बाहेरील परिस्थितीबद्दल अनभिज्ञ होता. सवर्ण म्हणुन सरकारी
नोकरीची शक्यताच नाही, खाजगी कंपनीत प्रचंड स्पर्धा, जातींचे लॉबींग, तसेच
आपआपल्या प्रदेशातील लोकांना नोकरी मिळावी म्हणुन होणारे प्रांतीय लॉबींग, यात हा
युवक पार गोंधळला., गडबडला. कधी शिक्षणाची संधी आपल्या जातीमुळे गमावावी लागली तर
कधी नोकरीची संधी आपल्या जातीमुळे गमावली. त्यातच वरून इतरांचे स्वतःच्या
जातीबद्दल टोमणे सहन करावे लागले. ही अवहेलना सहन ही होत नाही आणि घरातील संस्कारांमुळे
याला प्रतिवादही करता येत नाही. ‘मुलगा बिघडला’ हा शिक्का बसण्याची भिती. या
घुसमटीतून बाहेर निघायचे कसे ? एकच मार्ग, विद्रोह ! ‘‘मी ब्राह्मण नाही’’ हेच
सिध्द करायचे. पण कसे ? खुपच सोपा मार्ग म्हणजे जे जे म्हणुन ब्राह्मणांना निषिध्द
मानले आहे, त्याचाच स्विकार करायचा. आपोआप मी ब्राह्मण नाही हे सिध्द होईल, या
गैरसमजुतीमधून तो मांसाहार, धुम्रपान, मद्यपान करू लागतो. स्वतःचे ब्राह्मणत्व
नाकारण्याचा हा मार्ग निश्चितच चुकीचा आहे. परंतू, बालपणापासून त्याच्यासमोर
संस्कारांचा भलामोठा बागुलबुवा उभा केला जातो. तो त्याच्याशी, समाजातील त्या उलट
असणार्या परिश्थितीशी लढु शकत नाही, त्यामुळे त्यानी शोधून काढलेली ही पळवाट
असते.
सद्यस्थितीत या संस्कारांचा डोळसपणे विचार
करण्याची आवश्यकता आहे. दिवसभर शाळा,
वेगवेगळे क्लासेस, छंद वर्ग यातून वेळ काढून मुलांना, इतर मुलांमधे मिसळण्याकरीता,
लहान मोठ्या सार्वजनिक कायक्रमांमधे सहभागी होण्यास, समाजभिमुख होण्यास प्रोत्साहन
द्यावे. मुलांना वैचारिक स्वातंत्र्य द्यावे (अर्थातच अतिरेक होणार नाही याची
काळजी नक्कीच घ्यावी). मुलांमधे आक्रमता निर्माण व्हावी या दृष्टीने प्रयत्न
करावेत. कोणी टिंगल टवाळी केली तर दुर्लक्ष कर, सरळ घरी ये, असे सल्ले न देता,
मुलांना अशा परिस्थितीचा सामना कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करावे. मुलांच्या
शारिरिक वाढीबद्दल जसे पालक आग्रही असतात, तसेच त्यांनी मुलांमधे मानसिक कणखरता
निर्माण करण्यावर देखील भर द्यावा. वडीलधार्या मंडळींना, शिक्षकांना उलट उत्तर
देणे चुकीचे परंतू ‘अरे’ ला ‘कारे’ नी उत्तर दिलेच पाहीजे. सुसंस्कारित म्हणजे भ्याडपणा
नाही. तसेच, आक्रमकता म्हणजे वाया जाणे ही नाही, हे आधी पालकांनी समजून घेतले पाहीजे.
‘ठोशास ठोसा’ ही वृत्ती मुलांमधे आली तरच ते पुढील आयुष्याततील आव्हानांना सामना सक्षमपणे
करू शकतील, ही वास्तविकता पालकांनी ध्यानात घ्यावी. आपण जन्मजात ब्राह्मण आहोत, ही
जात कायमच आपल्याशी जोडल्या गेली आहे, त्यामुळे मांसाहार, धुम्रपान, मद्यपान करून
तुम्ही ही जात नाकारू शकत नाही, तर उलट तुमचेच नुकसान करून घेता आहात, हे मुलांना
पटवुन द्यावे. ब्राह्मणांवर होणार्या बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देण्याकरीता
मुलांनी अधिकाधिक वाचन करावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे.
प्रत्येक ब्राह्मण व्यक्तीने एक अत्यंत
महत्वाची बाब ध्यानात घ्यावी. आपण ब्राह्मण म्हणुन जन्म घेतला आहे. ही जात आपल्या
जन्मानंतर सातच दिवसात सरकारी कागदपत्रात नोंदल्या गेली आहे. शाळा, कॉलेज, नोकरीचे
ठिकाण अशा सर्वच ठिकाणी आपल्याला याची नोंद करावी लागते. इतकेच काय तर, बँकेतून
कर्ज घेतानाही जातीची नोंद करावी लागते. सरकार वेगवेगळ्या कागदपत्रांमधून त्याची
जाणीव करून देत असतेच. तुमचे आडनावसुध्दा तुमच्या जातीची ओळख देत असते. त्यामुळे,
जात नाकारणे वा जात नाकारण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबणे असे घातक उपाय (?)
करण्यापेक्षा संघटितपणे, सक्षमपणे याचा मुकाबला करणे, हाच ऐकमेव मार्ग आहे. हे आपण
स्वतः समजुन घेणे व आपल्या पुढील पिढीला देखील समजावुन सांगणे, हा या समस्येवरील
उपाय आहे. आपल्या संस्कारांचा योग्य अर्थ समजुन घेणे व तो मुलांना समजावुन सांगणे,
त्यांच्या मनात बिंबविणे, हे आजच्या पालकांपुढील आव्हान तसेच कर्तव्य देखील आहे. आपल्यातीलच काही लोक ब्राह्मण समाज संघटित होणे, त्यात विधायक बदल
होणे, याला ‘’जातीय’’ मानतात. त्यातच जर हिंदुत्वाची जोड मिळाली की यांना अजुनच
जोर येतो. परंतू, खरंच हे जातीय आहे ? माझ्यामते अजिबात नाही. कारण, जर माझ्या
मुलांनी योग्य वागणुक ठेवावी अशी मी अपेक्षा करत असेन तर आधी मला स्वतःला माझी
वागणुक तशी ठेवावी लागेल. त्यावेळेस माझे मुलं तसे वागतील. माझे मुलं योग्य वागत
असतील तर मी दुसर्या मुलांना त्यांच्या वागणुकीबद्दल बोलु शकेन. तसेच, जर माझा
समाज योग्य वागत असेल तर मी इतरांना तसे वागण्याचा सल्ला देवु शकेन वा सुचना करू
शकेन. मग जर मी माझ्या समाजात सकारत्मक बदल व्हावेत यासाठी प्रयत्न करत असेन तर ते
संकुचित कसे ठरेल ? याला जर संकुचितपणा मानला तर मी माझ्या मुलांना योग्य वळण
लावले, तेसुध्द्दा संकुचितपणाच ठरेल. संपूर्ण हिंदु धर्मात चैतन्य निर्माण करायचे
असेल तर आपल्याला आधी आपला समाज योग्य मार्गावर आणावा लागेल. आपला समाज योग्य
मार्गावर असेल तरच दुसर्यांना धडे देण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे. आज असा
नैतिक अधिकार आपल्याला आहे असे वाटते का ? आणि जर नाही वाटत, तर मग या प्रयत्नांना
जातीय, संकुचितपणा हे कोणत्या दृष्टिकोनातुन म्हटले जावे ? सद्यस्थितीत,
देशहिताकरीता ‘ब्राह्मण संघटित’’ होणे अत्यावश्यक आहे. नव्हे, ते आपले राष्ट्रीय
कर्तव्यच आहे. आपल्या संस्कारांचा, बुध्दीमत्तेचा व्यापक देशहिताकरीता कसा उपयोग
करता येईल या दृष्टीकोनातून विचार व्हावा, हीच अपेक्षा.
