श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त अभिवादन रॅली
रविवार दि.२१ ऑगस्ट २०११ रोजी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे, त्या थोर, निधड्या छातीच्या, अपराजित, सेनानायकाच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी "अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ" यांच्या वतीने दुचाकी रॅली व पदयात्रेचे आयोजन यशस्वी आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी पुतळा, कोथरूड येथून मा.आ. श्री. चंद्रकांतजी मोकाटे यांच्या उपस्थितीत पं. वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. शिवाजी पुतळा, कोथरूड येथून म्हात्रे पूलमार्गे नानासाहेब पेशवे यांच्या समाधी स्थळी साफसफाई व दीप पूजन करून, रॅली कुमठेकर रस्ता मार्गे चिमाजी आप्पा समाधी स्थळ (ओंकारेश्वर मंदिर) येथे पोहोचली, तिथे दीपपूजन करून सामील बंधू आणि भगिनींनी पदयात्रेद्वारे शनिवारवाडा कडे प्रस्थान केले. संपूर्ण रॅलीमध्ये तरुणांनाचा प्रचंड प्रतिसाद होता, "बाजीराव पेशवे कि जय", "ब्राम्हण एकता जिंदाबाद" अश्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
शनिवारवाडा येथे बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सांगता समारोहाचे प्रास्ताविक श्री. गोविंद कुलकर्णी यांनी केले तर श्री. उदयसिंहजी पेशवे (पेशवे वंशज) व श्री. मंदार परळीकर, श्री.संदीप खर्डेकर व श्री. मोहन शेटे ह्यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन श्री. देवव्रत बापट यांनी केले. यावेळी श्री. अनिल गानू हेही उपस्थित होते.
श्री. भालचंद्र दुघ्रेकर, सचिव (अ.भा.ब्रा.म.) आणि श्री. लक्ष्मीकांत धडफळे, अध्यक्ष (अ.भा.ब्रा.म. युवा) यांनी या महा रॅलीमध्ये सामील ब्रम्हवृन्दांचे आभार मानले व भविष्यात असे अनेक कार्यक्रम करण्याची योजना असल्याचे सांगितले.