Sunday, 23 October 2011

पहिली पायरी

             '' आम्ही मद्यशक्ती पुढे पुर्णपणे हतबल आहोत हे आम्ही मान्य केले. त्याच बरोबर आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे हे सुध्दा आम्ही मान्य केले.''
              ही पहिली पायरी जेव्हा वाचली त्यावेळी पहिला अर्धा भाग एकदम पटला, कारण आजपर्यंत मी अनेकदा दारु बंद करण्याचा निश्चय केला. कधी कधी पत्नीशी भांडण झाल्यानंतर अगदी मुलांची शपथ घेउन तिला सांगीतले कि उद्या पासुन दारु बंद , पण हे तेव्हड्यापुरतेच राहत होते. रात्रीचा दारु बंद करण्याचा निश्चय, सकाळी मी विसरुन जात होतो. दारुचं प्रचंड आकर्षण आणि अतिमद्यपानामुळे आलेली dependency  मला परत दारु पिण्यास बाध्य करायची. दारु न प्यायल्यामुळे होणारा शारिरीक त्रास ( हात पाय कापणे, छातीत धडधड होणे, डोकं दुखणे, अस्वस्थ वाटणे ) ह्यामुळे रात्रीची मुलांची शपथ, पत्नीला दिलेले वचन ह्याकडे दुर्लक्ष करुन दारु प्यायचो. त्यावेळी मनात असायचा कि फक्त सकाळी पिऊ म्हणजे त्रास थांबेल मग परत हात लावायचा नाही. पण, थोडं पिऊन समाधान होत नाही मग असं वाटायचं कि आत्ता एकदाच तर प्यायची आहे मग बंदच करायची आहे तर मग अजुन थोडी प्यायला काय हरकत आहे ? असं करत करत शेवटी मी माझा कोटा पुर्ण होतपर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्त पित होतो. आणि सकाळी जास्त झाली कि परत रात्री उतारा म्हणुन प्यायची मग रात्री जास्त झाली कि मग परत त्याचा उतारा म्हणुन दुसर्‍या सकाळी तोच निश्चय, तोच क्रम ..... हे असंच चक्र सुरु राह्यचे, कारण माझ्यामधे असलेली असमाधानी वृत्ती. एक पेग, दोन पेग पिऊन मी दारु पिणं थांबवु शकत नाही. जो पर्यंत मला किक् बसत नाही तो पर्यंत माझे समाधान होत नाही, तोपर्यंत मला दारु हवी असते.
              मला हे मान्य करावेच लगेल कि मी दारुपुढे पुर्ण हतबल आहे, कारण मी जेंव्हा स्वःला सुशिक्षीत, चांगल्या घरातला मुलगा समजतो पण दारुसाठी मी आजपर्यंत किती लाचार होतो ? कोणालाही पैसे उधार मागणे, बारवाला, पानपट्टीवाला, अगदी गाडी पंक्चर दुरुस्तीवाल्याकडुन पैसे उधार घेताना मी स्वाभिमान विसरत होतो. कोण्त्याही अंड्याच्या गाडीवर, कचराकुंडीच्या बाजुला, नाल्याच्या बाजुला बसुन मी दारु पित होतो. कोणाचाही उष्टा पेला मला चालत होता, कोणतेही पाणी मी पित होतो, प्रसंगी कोरी दारु पण पीत होतो. हे आठवले की लक्षात येते, मी मद्यशक्ती शारिरीकदृष्या  आणि मानसिकदृष्या पूढे पुर्णपणे हतबल आहे. शारिरीक ह्यासाठी की, जी  Dependency  माझ्यात आली आहे, की दारु पिलो नाहीतर माझे हात पाय कापतात, छातीत धडधड होते, अस्वस्थ वाटायला लागतं आणि हा त्रास मी सहन करु शकत नाही हे थांबवायला मी पुन्हा दारु पितो. मानसिकदृष्या मी दारुपुढे हतबल आहे. दारु प्यायल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढतो, माझी एनर्जी वाढते, कोणतेही काम मी जास्त चांगल्याप्रकारे करु शकतो, या माझ्या (गैर) समजामुळे मी परत परत दारु पितो. घडतं उलट ... काम चांगले व्हावे म्हणुन मी थोडी प्यायला जातो पण माझा कोटा पुर्ण होतपर्यंत माझं समाधान होत नाही, मग दारु जास्त झाली की माझा आत्मविश्वास 'शुन्य' होतो, एनर्जी वाढण्याएवजी मी झोपुन जातो, यावरुन हेच दिसते की मी दारु पुढे हतबल आहे.
            ही हतबलता माझ्या कमकुवत मानसिकतेमुळे आली आहे. लहान लहान गोष्टींवर अवलंबुन राहण्याची जी माझी मानसिकता त्यामुळे मी दारुवर पण अवलंबुन राहु लागलो. एखाद्या दिवशी मोबाइल घरी विसरलो किंवा बॅटरी डिसचार्ज झाली तर मी खुप अस्वस्थ होतो. मोबाइल नसल्यामुळे माझे खुप अडते अश्यातला काही भाग नाही तरी पण मी अस्वस्थ होतो. हाताला घड्याळ नसले तरी मी तसाच अस्वस्थ होतो. कधी गाडी खराब असली तर मी इतर मार्गानी काम करण्यापेक्षा आज माझ्याजवळ गाडी नाही, आज काहीच काम होणार नाही म्हणुन बारमधे जाउन बसतो. कोणत्याही अडचणीवर मार्ग काढण्यापेक्षा माझे नशीब किती खराब आहे याचे रडगाणे गात बारमधे बसतो. ह्या मानसिकतेमुळे मी दारु बंद करण्यासाठी जे प्रयत्न केले ते असफल ठरले. शारिरीक आणि मानसिक  Dependency माझ्यात असल्यामुळे मी माझ्या एकट्याच्या बळावर दारु बंद करु शकत नाही, आणि ज्या गोष्टी आपण स्वबळावर करु शकत नाही त्यापुढे हे मान्य करावेच लागेल की आम्ही मद्यशक्ती पुढे पुर्णपणे हतबल आहोत.
                  पहिल्या पायरीचा दुसरा अर्धा भाग ''आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे हे सुध्दा आम्ही मान्य केले,''  खरंच, व्यसनाधिनतेच्या काळाचा विचार करताना आठवलं की आपण किती अस्ताव्यस्त आयुष्य जगत आहोत. सर्वसामान्य आयुष्य कसं जगतात हेच विसरलो आहोत. सुदृढ शरीराची संपुर्ण माती झाली, हात पाय कापणे, छातीत धडधडणे, अस्वस्थता, कोणत्याही कामात मन न लागणे, पचनशक्ती कमी झाली, स्मरणशक्ती कमी झाली, स्टॅमिना कमी झाला हे शारिरीक नुकसान तर झालेच पण दारु पिण्याच्या प्रबळ इच्छेपुढे शरीराच्या स्वच्छतेकडेही लक्ष नव्हते. सकाळी जाग आल्यावर दारु प्यायची इतकी घाई झालेली असायची की कधी दात घासत नव्हतो, आंघोळ करत नव्हतो, मळलेले, चुरगळेले , घामाचा वास येत असलेले कपडे, वाढलेली दाढी अश्या अवतारात बारमधे कोणी मला बघितल्यानंतर त्यांना विश्वास बसायचा नाही की हा एका क्लास वन ऑफीसरचा स्वःत इंजिनिअर असलेला मुलगा आहे. जेवणाकडे, खाण्याकडे दुर्लक्ष हा तर रोजचाच प्रकार होता. पोट भरलेलं असेल तर दारुची किक् बसत नाही म्हणुन आधी उपाशी राह्यचे आणि नंतर दारु इतकी जास्त व्हायची की जेवणाची, काही खाण्याची इच्छाच राह्यची नाही, त्यामुळे प्रचंड ऍसिडीतीचा त्रास सुरु झाला, अशक्तता आली, डोळ्यापुढे अंधारी यायची, चक्कर यायची, मग्‍ त्यासाठी ग्लुकोज घ्यायचे, सलाईन घ्यायचे पण दारु बंद करावी, असा विचारही मनात येत नव्हता. शरीराची धुळधाण होत होती पण त्याकडे लक्ष न देता दारु पिणे सुरुच होते.
               ह्याकाळात माझ्या मानसिकतेमधे ही खुप बदल झाला होता. जगण्यातला आनंद मी विसरलो होतो, कोणत्याही गोष्टीत इंटरेस्ट, उत्साह वाटत नव्हता. स्वभावात खुप विचित्र बदल झाले होते. लोकांप्रति, कुटुंबियांप्रती, प्रेम, आस्था वाटेनाशी झाली होती. को













                   




Wednesday, 19 October 2011

आभार !!!

 काल माझ्या वाढ्दिवसानिमीत्तानी आपण सर्वांनी फोन, sms, फेसबुकच्या माध्यमातुन माझ्यावर शुभेच्छांचा जो वर्षाव केला त्याचे आभार मानायला माझ्याजवळ शब्द नाहीत, खुप खुप आभार !!!!! 
आपले प्रेम असेच राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!




Thursday, 6 October 2011

परिचय पत्र

नमस्कार,
                  मी,  अमोघ अनंत टेंभेकर, व्यवसाय - सिव्हील इंजिनिअर, सध्या पुणे येथे कार्यरत आहे.
 आपणांस कळविताना आनंद होतो आहे, नुकतेच "अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ" यांनी माझी  "प्रसिद्धी प्रमुख (महाराष्ट्र) " ह्या पदावर नेमणुक करून मला सन्मानित केले आहे.
                "अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ" ही राष्ट्रीय संघटना असून सध्या संपूर्ण भारत देशात १२ राज्यात समाजबांधवांचे एकत्रीकरण व सबलीकरण करण्याचे कार्य संघटना करीत आहे. आपल्या प्रबळ संघटन बांधणी व कार्यकर्त्यांच्या सहाय्याने ब्राह्मण समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न संघटना प्रभावीपणे करीत आहे. ह्या कार्याला अधिक गती मिळावी व हे कार्य अधिक जोमानी पुढे जावे ह्यासाठी संघटनेची "युवा आघाडी" नेमण्यात येत आहे. मागील महिन्यात पुणे शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची घोषीत झाली आहे.
                  "अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ" यांनी ऑगस्ट महिन्यात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती निमित्तानी दुचाकी रॅली,  मागील महिन्यात, आगामी महानगरपालिका व जि.प. निवडणुकीत ब्राह्मण समाजाची भूमिका काय असावी ? ह्यावर एक चर्चासत्र आयोजित केले होते, तसेच 24 डिसेंबर 2011 रोजी पुणे जिल्ह्यातील नागरिकांचा भव्य ब्राह्मण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. www.brahmanmahasangh.org ह्या वेब साईटच्या माध्यमातून वधु-वर सूचक आणि नोकरीविषयक माहिती देणे हा उपक्रम सुरु होत आहे. अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजबांधवांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांना संघटीत करणे हा "अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा" उद्देश असेल.
                 वेळोवेळी होणाऱ्या अश्या कार्यक्रमांची प्रसिद्धी चांगल्या रीतीने व्हावी, ही जबाबदारी माझ्यावर असेल. ह्या कार्यात आपले बहुमोल सहकार्य मला लाभावे अशी अपेक्षा आहे. त्याकरिता हा प्रपंच !
आपल्या प्रतिसादाची वाट बघत आहे.

धन्यवाद !
                                                                                                                                 आपला,

                                                                                                                     अमोघ अनंत टेंभेकर
                                                                                                                        ९८ २३६ ३७ २३२
                                                                                                           mediams@brahmanmahasangh.org
                                                                                           

Sunday, 2 October 2011

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

                कृपया प्रसिद्धीकरिता 
 अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित ब्राह्मण समाजाचा चिंतन मेळावा
आज दिनांक २ आक्टोबर २०११ रोजी लोकमान्य सभागृह, केसरी वाडा , नारायणपेठ , पुणे येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फ़े आगामी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकी मध्ये ब्राह्मण समाजाचे धोरण काय असावे या विषयावर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये पुणे शहरात ब्राह्मण समाजाकरीता कार्यरत  आसलेल्या सुमारे २८ संघटनाचे पाधाधिकारी, युवक आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते. वेदमंत्राच्या घोषामध्ये ठिक ११ वाजता मेळाव्यास सुरवात झाली.
 आखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री गोविंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात त्यांनी ब्राह्मण समाजास कोणताही पक्ष वर्ज्य नाही. आज सर्व समाज एकत्र असून आमची दखल सर्वच राजकीय  पक्षांनी घ्यावी इतके सामर्थ्य ब्राह्मण समाजाकडे आहे. आज पर्यंत आम्ही ब्राह्मण समाज म्हणुन कोणात्याही निवडणुकीत भाग घेतलेला नसला तरी कोणत्याही उमेदवाराचे राजकीय भविष्य ठरविण्याइतके सामर्थ्य ब्राह्मण समाजाकडे आहे त्यामुळे  सर्वच राजकीय पक्षानां आता ब्राह्मण समाजाची दखल घ्यावी लागणार आहे हे निश्चीत आहे असे सांगितले. ह्यापुढे ब्राह्मण समाजाची भूमिका ही निर्णायक असणार आहे अशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची ठाम भूमिका मांडली.
पुण्यातील प्रसिध्द कायदेतज्ञ श्री. प्रमोद आडकर म्हणाले की “ महानगरपालिके मध्ये स्वच्छ चारित्राचे उमेदवार हवे असल्यामुळे जास्तीत जास्त ब्राहमण समाजातील व्यक्तीनी निवडणुकीत भाग घेतला पाहीजे, जर योग्य उमेदवार असून फ़क्त पैश्याअभावी त्यास निवडणुक लढविणे शक्य नसेल तर त्या साठी निधी गोळा करुन अश्या योग्य आणि सक्षम उमेदवारास निवडुन दिले पाहिजे, यासाठी ब्राह्मण समाजातील उद्योजकांनी सढ्ळ हातानी मदत केली पाहिजे, असे नमूद केले.
श्री माधव दामले यांनी महापालिकेची निवडणुक प्रभागवार कशी होणार आहे. आपणांस कसे मतदान करणार आहोत याची मुद्देसुद माहिती दिली. पुणे महापालिकेमध्ये चांगले उमेदवार का हवे आहेत याचे महत्व त्यांनी उदाहरणे देवुन सांगितले. विविध विकास कामे कशी करता येतील  याची माहीती. दिली.
श्री . ह. मो. मराठे यांनी ब्राह्मण वर्गाने सक्रिय राजकारणात का भाग घेतला पाहिजे हे सांगितले. यापुढे या देशात जाती द्वेषावर आधारित राजकारण चालणार नाही. आपल्या राजकिय फ़ायद्यासाठी काही राजकिय पक्ष ब्राह्मण समाजावर टिका करुन राजकीय फ़ायदा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण असे जातीद्वेषाचे राजकारण फ़ार दिवस चालत नाही. जनतेपुढे त्यांचा खरा चेहरा येण्यास वेळ लागत नाही. त्या मुळे कोणी ब्राह्मण द्वेषाचे  राजकारण करु नये. ठणकावुन सांगितले. जर तसा कोणी प्रयत्न केला तर ब्राह्मण समाज तो सहन करणार नाही. मतपेटी द्वारे  तो आपला रोष व्यक्त केल्याशिवाय रहाणार नाही. ही जाणीव त्यांनी राजकियपक्षांना करुन दिली.
या मेळ्याव्यात अनेक तरुण तरुणींनी आपली मते मांडली. स्वागत श्री. माधव हरिहर यांनी केले, श्री. प्रल्हाद काकडे यांनी सूत्रसंचालन केले तर श्री. लक्ष्मीकांत धडफळे  यांनी आभार मानले.  आरती देशपांडे यांच्या पसायदानाने कार्क्रमाची सांगता झाली. अशी माहिती श्री. अमोघ टेंभेकर (प्रसिद्धी प्रमुख, अ.भा.ब्रा.म.) यांनी दिली.