Sunday, 23 October 2011

पहिली पायरी

             '' आम्ही मद्यशक्ती पुढे पुर्णपणे हतबल आहोत हे आम्ही मान्य केले. त्याच बरोबर आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे हे सुध्दा आम्ही मान्य केले.''
              ही पहिली पायरी जेव्हा वाचली त्यावेळी पहिला अर्धा भाग एकदम पटला, कारण आजपर्यंत मी अनेकदा दारु बंद करण्याचा निश्चय केला. कधी कधी पत्नीशी भांडण झाल्यानंतर अगदी मुलांची शपथ घेउन तिला सांगीतले कि उद्या पासुन दारु बंद , पण हे तेव्हड्यापुरतेच राहत होते. रात्रीचा दारु बंद करण्याचा निश्चय, सकाळी मी विसरुन जात होतो. दारुचं प्रचंड आकर्षण आणि अतिमद्यपानामुळे आलेली dependency  मला परत दारु पिण्यास बाध्य करायची. दारु न प्यायल्यामुळे होणारा शारिरीक त्रास ( हात पाय कापणे, छातीत धडधड होणे, डोकं दुखणे, अस्वस्थ वाटणे ) ह्यामुळे रात्रीची मुलांची शपथ, पत्नीला दिलेले वचन ह्याकडे दुर्लक्ष करुन दारु प्यायचो. त्यावेळी मनात असायचा कि फक्त सकाळी पिऊ म्हणजे त्रास थांबेल मग परत हात लावायचा नाही. पण, थोडं पिऊन समाधान होत नाही मग असं वाटायचं कि आत्ता एकदाच तर प्यायची आहे मग बंदच करायची आहे तर मग अजुन थोडी प्यायला काय हरकत आहे ? असं करत करत शेवटी मी माझा कोटा पुर्ण होतपर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्त पित होतो. आणि सकाळी जास्त झाली कि परत रात्री उतारा म्हणुन प्यायची मग रात्री जास्त झाली कि मग परत त्याचा उतारा म्हणुन दुसर्‍या सकाळी तोच निश्चय, तोच क्रम ..... हे असंच चक्र सुरु राह्यचे, कारण माझ्यामधे असलेली असमाधानी वृत्ती. एक पेग, दोन पेग पिऊन मी दारु पिणं थांबवु शकत नाही. जो पर्यंत मला किक् बसत नाही तो पर्यंत माझे समाधान होत नाही, तोपर्यंत मला दारु हवी असते.
              मला हे मान्य करावेच लगेल कि मी दारुपुढे पुर्ण हतबल आहे, कारण मी जेंव्हा स्वःला सुशिक्षीत, चांगल्या घरातला मुलगा समजतो पण दारुसाठी मी आजपर्यंत किती लाचार होतो ? कोणालाही पैसे उधार मागणे, बारवाला, पानपट्टीवाला, अगदी गाडी पंक्चर दुरुस्तीवाल्याकडुन पैसे उधार घेताना मी स्वाभिमान विसरत होतो. कोण्त्याही अंड्याच्या गाडीवर, कचराकुंडीच्या बाजुला, नाल्याच्या बाजुला बसुन मी दारु पित होतो. कोणाचाही उष्टा पेला मला चालत होता, कोणतेही पाणी मी पित होतो, प्रसंगी कोरी दारु पण पीत होतो. हे आठवले की लक्षात येते, मी मद्यशक्ती शारिरीकदृष्या  आणि मानसिकदृष्या पूढे पुर्णपणे हतबल आहे. शारिरीक ह्यासाठी की, जी  Dependency  माझ्यात आली आहे, की दारु पिलो नाहीतर माझे हात पाय कापतात, छातीत धडधड होते, अस्वस्थ वाटायला लागतं आणि हा त्रास मी सहन करु शकत नाही हे थांबवायला मी पुन्हा दारु पितो. मानसिकदृष्या मी दारुपुढे हतबल आहे. दारु प्यायल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढतो, माझी एनर्जी वाढते, कोणतेही काम मी जास्त चांगल्याप्रकारे करु शकतो, या माझ्या (गैर) समजामुळे मी परत परत दारु पितो. घडतं उलट ... काम चांगले व्हावे म्हणुन मी थोडी प्यायला जातो पण माझा कोटा पुर्ण होतपर्यंत माझं समाधान होत नाही, मग दारु जास्त झाली की माझा आत्मविश्वास 'शुन्य' होतो, एनर्जी वाढण्याएवजी मी झोपुन जातो, यावरुन हेच दिसते की मी दारु पुढे हतबल आहे.
            ही हतबलता माझ्या कमकुवत मानसिकतेमुळे आली आहे. लहान लहान गोष्टींवर अवलंबुन राहण्याची जी माझी मानसिकता त्यामुळे मी दारुवर पण अवलंबुन राहु लागलो. एखाद्या दिवशी मोबाइल घरी विसरलो किंवा बॅटरी डिसचार्ज झाली तर मी खुप अस्वस्थ होतो. मोबाइल नसल्यामुळे माझे खुप अडते अश्यातला काही भाग नाही तरी पण मी अस्वस्थ होतो. हाताला घड्याळ नसले तरी मी तसाच अस्वस्थ होतो. कधी गाडी खराब असली तर मी इतर मार्गानी काम करण्यापेक्षा आज माझ्याजवळ गाडी नाही, आज काहीच काम होणार नाही म्हणुन बारमधे जाउन बसतो. कोणत्याही अडचणीवर मार्ग काढण्यापेक्षा माझे नशीब किती खराब आहे याचे रडगाणे गात बारमधे बसतो. ह्या मानसिकतेमुळे मी दारु बंद करण्यासाठी जे प्रयत्न केले ते असफल ठरले. शारिरीक आणि मानसिक  Dependency माझ्यात असल्यामुळे मी माझ्या एकट्याच्या बळावर दारु बंद करु शकत नाही, आणि ज्या गोष्टी आपण स्वबळावर करु शकत नाही त्यापुढे हे मान्य करावेच लागेल की आम्ही मद्यशक्ती पुढे पुर्णपणे हतबल आहोत.
                  पहिल्या पायरीचा दुसरा अर्धा भाग ''आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे हे सुध्दा आम्ही मान्य केले,''  खरंच, व्यसनाधिनतेच्या काळाचा विचार करताना आठवलं की आपण किती अस्ताव्यस्त आयुष्य जगत आहोत. सर्वसामान्य आयुष्य कसं जगतात हेच विसरलो आहोत. सुदृढ शरीराची संपुर्ण माती झाली, हात पाय कापणे, छातीत धडधडणे, अस्वस्थता, कोणत्याही कामात मन न लागणे, पचनशक्ती कमी झाली, स्मरणशक्ती कमी झाली, स्टॅमिना कमी झाला हे शारिरीक नुकसान तर झालेच पण दारु पिण्याच्या प्रबळ इच्छेपुढे शरीराच्या स्वच्छतेकडेही लक्ष नव्हते. सकाळी जाग आल्यावर दारु प्यायची इतकी घाई झालेली असायची की कधी दात घासत नव्हतो, आंघोळ करत नव्हतो, मळलेले, चुरगळेले , घामाचा वास येत असलेले कपडे, वाढलेली दाढी अश्या अवतारात बारमधे कोणी मला बघितल्यानंतर त्यांना विश्वास बसायचा नाही की हा एका क्लास वन ऑफीसरचा स्वःत इंजिनिअर असलेला मुलगा आहे. जेवणाकडे, खाण्याकडे दुर्लक्ष हा तर रोजचाच प्रकार होता. पोट भरलेलं असेल तर दारुची किक् बसत नाही म्हणुन आधी उपाशी राह्यचे आणि नंतर दारु इतकी जास्त व्हायची की जेवणाची, काही खाण्याची इच्छाच राह्यची नाही, त्यामुळे प्रचंड ऍसिडीतीचा त्रास सुरु झाला, अशक्तता आली, डोळ्यापुढे अंधारी यायची, चक्कर यायची, मग्‍ त्यासाठी ग्लुकोज घ्यायचे, सलाईन घ्यायचे पण दारु बंद करावी, असा विचारही मनात येत नव्हता. शरीराची धुळधाण होत होती पण त्याकडे लक्ष न देता दारु पिणे सुरुच होते.
               ह्याकाळात माझ्या मानसिकतेमधे ही खुप बदल झाला होता. जगण्यातला आनंद मी विसरलो होतो, कोणत्याही गोष्टीत इंटरेस्ट, उत्साह वाटत नव्हता. स्वभावात खुप विचित्र बदल झाले होते. लोकांप्रति, कुटुंबियांप्रती, प्रेम, आस्था वाटेनाशी झाली होती. को













                   




No comments:

Post a Comment