आजच्या जागतिकीकरणाच्या लाटेत ब्राह्मण समाज आपल्या प्राचीन मुल्य व मुळ संस्कृतीपासुन दुरावतो आहे आणि हेच आज ब्राह्मणांसमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांचे कारण आहे. हे संस्कार आजच्या तरुण पिढीमधे पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे. ‘संध्यारुपी’’ ज्ञानासोबतच ‘‘संगणकरुपी’’ विज्ञानाची कास धरुन पुढील पिढीला ज्ञानाचे अधिष्ठान देण्यास ‘‘ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’’ कटीबध्द आहे. आपल्या ह्याच उद्देशाला अनुसरुन अ.भा.ब्राह्मण महासंघाने ‘ब्रह्मजागृती’’ प्रकाशनाच्या माध्यमातुन ‘‘ब्रह्मकेसरी’’ या मासिकाची सुरुवात केली. आगामी काळात संघटनेचे धोरण, वेळोवेळी योजण्यात येत असलेले कार्यक्रम आदींवर सुसंवाद साधण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल.
नुकतेच 24 डिसेंबर 2011 रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे ‘‘पुणे जिल्हा’’ महाअधिवेशन ज्ञाती बांधवांच्या प्रचंड प्रतिसादात व उत्साहात यशस्वीपणे पार पडले. त्यापुर्वी, ‘’प्रदेश युवा आघाडी’’, पुणे शहर ‘युवा आघाडी’’, ‘पुणे जिल्हा’’, ‘’पिंपरी-चिंचवड शहर’’ अश्या प्रमुख चार कार्यकारिणींची स्थापना करण्यात आली तसेच पुणे शहरातील विविध मंडल कार्यकारिणींच्या बांधणीचे कार्यही जोमानी सुरु आहे. कार्यकारिणींचे गठण, पदाधिकार्यांची नियुक्ती यासोबत ‘’सभासद नोंदणी’’चे कामही वेगानी सुरु आहे.
या सर्व घडामोडींमुळे इतर समाज व राजकीय पक्षांना आता ब्राह्मणांची दखल घेण्यास भाग पडते आहे. संघटनेनी नुकतेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांना पत्र पाठवुन लोकसंख्येच्या आधारावर ब्राह्मण उमेदवारांची मागणी केली, त्याला सगळ्याच पक्षांनी प्रतिसाद दिला आहे. काही ब्राह्मणविरोधी घटक सतत काही ना काही कुरापत काढुन समाजात अस्थिरता माजवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशांवर संघटना बारीक लक्ष ठेऊन आहे. याच समाजद्रोही घटकांच्या अपप्रचारामुळे दोन वर्षांपुर्वी लालमहालातुन मध्यरात्री दादोजी कोंडदेवांचा पुतळा कापुन हलवण्यात आला. आता तर ते समर्थ रामदास स्वामींचा मानभंग करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा अपप्रवृत्तींना घटनात्मक मार्गानी वेळीच रोखले पाहिजे. येणार्या निवडणुकीत अशांना पाठीशी घालणार्या राजकीय नेत्यांना व पक्षांना त्यांची जागा दाखवायला ब्राह्मणांचे 100% मतदान होईल याची काळजी घेण्याची गरज आहे. अश्या प्रवृत्तींना सदनात जाण्यापासुन परावृत्त करायला यावेळी घराबाहेर पडा व आपला मताधिकार वापरा अन्यथा भविष्यकाळात आपली पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही याची पक्की खुणगाठ मनाशी बांधुन घ्या.
‘‘ ब्राह्मणांनो, जागे व्हा, शत-प्रतिशत मतदान करा ’’