आपल्या ग्रुपचा मुळ उद्देश समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून दहशतवादाचा विरोध करणे असा आहे. कोणताही राजकीय पक्ष, धर्म, जात, पंथ ह्याला आपला विरोध नाही. दहशतवादाला विरोध म्हणजे नेमके काय करायचे ? निदर्शने करायचे, मोर्चा काढायचा, जाहीर सभा घ्यायच्या, नारे द्यायचे ? असे अजिबात नाही. आपला विरोध झालेल्या घटनांवर तिखट प्रतिक्रिया देणे असा अभिप्रेत नाही तर, अश्या घटना होऊ नये, ह्याला पायबंद बसावा आणि दुर्दैवानी असे काही घडले तर त्वरित आपण संघटीतपणे मदतकार्य सुरु शकलो पाहिजे अशी रचना आपल्याला उभी करायची आहे. अश्या घटना घडू नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, बाहेर वावरताना आपल्या भोवती काय सुरु आहे ह्याचे भान कसे ठेवावे, संकटकाळी कोणाशी संपर्क करायचा आणि कसा करायचा, अशी घटना घडलीच तर न घाबरता, न गोंधळता त्वरित मदतकार्य कसे सुरु करायचे हे आपल्याला समाजापर्यंत पोहचवायचे आहे. आपण सर्व मित्र ह्या ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात राहू, आपल्यातले जाणकार मार्गदर्शन करतीलच तसे खबरदारीचे उपाय आपण सर्व समाजापर्यंत पोहचवण्याचे काम करू.
आता आपण जिल्हावाऱ, तालुकावार आपल्यातील नावांची यादी बनवतो आहोत जेणेकरून संपर्क करणे, मदतकार्य सुरु करणे ( ह्यात अगदी आर्थिक मदत ते रक्तदान सर्व आले) जास्त सोपे होईल. आपल्यात जवळपास सगळ्या जिल्ह्यातले मित्र सामील आहेत, ज्याला जसे सोयीचे असेल तसे काम आपण वाटून घेऊ. ज्यांना ह्यात प्रत्यक्ष काम करण्याची इच्छा आहे त्यांनी संपर्क साधावा, आणि जे प्रत्यक्ष काम करू शकत नाहीत त्यांनी आपले निरीक्षण, अनुभव, त्यांच्या काही कल्पना आणि हे कार्य अधिक प्रभावी कसे होऊ शकेल ह्याबद्दल आम्हाला सूचना कराव्यात. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. आपल्यात प्रत्यक्ष संघटन क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर आहेत, त्यांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे. शेवटचे पण महत्वाचे, ज्यांना काही कारणांनी प्रत्यक्ष काम करता येत नसेल त्यांनी अजिबात संकोच बाळगू नये, सर्वांचे ग्रुपमध्ये तेव्हडेच महत्व आहे, आपल्या सूचना प्रत्यक्ष काम करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात, आपला सदैव सहभाग सुरु ठेवावा. धन्यवाद !
No comments:
Post a Comment