ब्राह्मण आणि हिंदुत्व यावर अनेकांचा संभ्रम आहे. ब्राह्मणत्व हा शब्द आला की सरळ सोपा अर्थ काढल्या जातो की जो कर्माने ब्राह्मण असेल तो ब्राह्मण. ''आम्ही ब्राह्मणत्व कधीच सोडले आहे,'' असे म्हटल्या जाते. पण, यात कितपत तथ्य आहे ? आपण मातेच्या गर्भात अंकुरतो त्याच वेळी ब्राह्मण ही ''जात'' आपल्या नावामागे चिकटते. मुल जन्माला आल्यानंतर सात दिवसातच तयार झालेल्या जन्म दाखल्यात त्या बाळाची जात ''ब्राह्मण'' लिहील्या जाते. मग ते मुल मोठे झाल्यावर आपले ब्राह्मणत्व टिकवणार की नाही याची कोणीही चिंता करीत नसतो. मग आता मोठा झाल्यावर कशाला हा खटाटोप ? चांगले मार्क्स मिळवुनही ज्यावेळी प्रवेश नाकारला जातो तो त्या विद्यार्थ्याची जात बघुन न की तो ब्राह्मणत्व पाळतो अथवा नाही हे तपासून, एखाद्या लायक कर्मचार्याला तो ब्राह्मण म्हणुन पदोन्नती नाकारली जाते, ते त्याची जात बघुन, न की तो ब्राह्मणत्व पाळतो अथवा नाही, याची खातरजमा करुन. ''ब्राह्मणांची सरसकट कत्तल करा'' असे फर्मान निघते त्यावेळी कोणी जर ब्राह्मणत्व पाळत नसेल त्याला सोडुन द्या, असे म्हटले जात नाही. तुमचे आडनाव हीच तुमच्या जात दर्शवत असते, मग विनाकारण वारंवार ''ब्राह्मणत्वाचा'' मुद्द्दा का काढला जातो ?
कदाचित, हे दडपणच आजच्या र्हासाला कारणीभूत असावे. ब्राह्मण म्हणुन ज्या वेळी उपहासाचा सामना करावा लागतो, कुचेष्टा सहन करावी लागते, त्या वेळी मी ब्राह्मण म्हणुन का जन्माला आलो ? असा सवाल मुलांपुढे उभा राहतो. ज्यावेळी ब्राह्मण असल्यामुळे उपेक्षा सहन करावी लागते, अवहेलना सहन करावी लागते, त्यावेळी संताप होत असतो पण व्यक्त करता येत नाही. या मानसिक कोंडीतून बाहेर पडण्याकरीता मग ब्राह्मण तरूण मग चुकीचा मार्ग अवलंबतो. सिगरेट ओढणे, दारू पिणे, मांसाहार करणे, गुंडगिरी करणे हे प्रकार सुरू होतात कारण त्याला आपले जन्मजात ब्राह्मणत्व नाकारायचे असते. मार्ग जरी चुकीचा असला तरी या त्याला मार्गावर यायला कोण प्रवृत्त करतो ? याचा कधी विचार केला का ? ब्राह्मण म्हणुन उपेक्षा सहन करण्यापेक्षा तो ब्राह्मणत्व नाकारण्याचा चुकीचा पण सोपा मार्ग निवडतो. आपल्यावरचा ''ब्राह्मण'' हा शिक्का पुसायला तो अनेक धडपडी करू लागतो. आपण कितीही कंठशोष केला की, ब्राह्मणत्व पाळतो तो ब्राह्मण, जो जन्माने आहे पण कर्माने ब्राह्मण नव्हे, हे समाजात कितपत मान्यताप्राप्त आहे ? अजुनही आपले आडनाव हीच आपली, पर्यायानी आपल्या जातीची ओळख असते. याचे भान आपल्याला कधी येणार ?
राहीला मुद्दा हिंदुत्वाचा. आम्ही हिंदुस्थानी आहोत, हिंदु आहोत, हे नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. हिंदु आहोत म्हणुन ब्राह्मण आहोत, हे पुर्णपणे मान्य आहे. परंतू, सद्यस्थितीत, हिंदुंमधीलच काही समाजद्रोही, ब्राह्मणविरोधी वातावरण तयार करत असताना किती काळ शांत बसणार ? ब्राह्मणांची सरसकट हत्या करा असे फर्मान निघते, या प्रकारांना राजकीय पाठींबा मिळतो. आणि, अशाही परिस्थितीत हिंदुत्ववादी संघटना ब्राह्मणांना सबुरीचा सल्ला देतात, हे संतापजनक आहे. जातीय विव्देषाच्या या राजकारणात ते आपली हिंदुत्वाची पोळी शेकतात, हे खेदजनक आहे. का म्हणुन फक्त ब्राह्मणांनीच सबुरी दाखवावी ? का म्हणुन जातीय सलोखा राहावा यासाठी फक्त ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यावा ? ही मानसिकताही आपण ब्राह्मण असल्याचा आपल्याला न्युनगंड आहे, हेच दर्शवते. आम्ही ब्राह्मण नाही, हे दर्शवण्याच्या चढाओढ सुरू आहे. ''मी ब्राह्मण नाही'' हे दर्शवण्याचा गोंडस मार्ग म्हणजे ''हिंदुत्ववादी'' म्हणवुन घेणे. मी जात-पात मानत नाही. आम्ही सर्व हिंदु आहोत. असे म्हटले की यांना वाटते आपल्यावरचा ब्राह्मण हा शिक्का पुसला जाईल. पण हेच लोक ज्यावेळी काही योजना आखत असतात त्यावेळी कोणत्या भागात कोणत्या जातीसाठी काम केल्याने अधिक लाभ होईल याचा हिशोब मांडत असतात. त्यावेळी कुठे जाते ''हिंदुत्व'' ? शुद्रांना वेदाभ्यासाचे प्रशिक्षण दिले, अशी जाहीरात करताना का ''शुद्र'' शब्द वापरता ? कारण त्याशिवाय यांच्या कार्याला महानता कशी येणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली आपला न्युनगंड लपवणे सोडा आणि खुलेपणानी आपले ब्राह्मणत्व स्विकारा. सद्यस्थितीतील समस्येवर विनाकारण फाटे फोडुन समस्या वाढवण्यापेक्षा या प्रयत्नात सहभागी व्हा, यातुन मार्ग काढायला तुमचाही हातभार लागु द्या. अन्यथा, आज तर तरुण प्2ढीत फक्त अगतिकता आहे, त्याचे रूपांतर एकतर उद्रेकात होईल अथवा पुढील पिढी, फक्त जातच नाहीतर धर्म बदलायलाही बाध्य होईल. एकच आवाहन करतो, या समस्येचे गांर्भिय समजुन घ्या आणि या अभियानात सहभागी व्हा.
धन्यवाद !

No comments:
Post a Comment