तुषार सरांनी मला माझे अनुभव लिहायला सांगितले पण मी कधी काही लिहिले नाही पण तरी थोडंबहुत लिहायचा प्रयत्न करते.
अमोघला सवय आहे हे लग्नाच्या आधीच माहिती होते मात्र खूप कमी सवय होती त्यामुळे कधी आक्षेप घेतला नाही. लग्नानंतर २ वर्षात त्याचे प्रमाण अचानक वाढू लागले.काहीच कारण कळेनासे झाले. कधी वाटायचे आपलीच काही चूक असेल तर कधी वाटायचे मित्र तसे आहेत म्हणून हा वाया जातो आहे. हा आजार आहे वगैरे काही माहितीच नव्हते. त्याची तब्येत बिघडायला लागली, घरातली वागणूक बदलली तशी माझी काळजी पण वाढायला लागली. आपल्या सर्वसामान्य मानसिकतेप्रमाणे आधी मित्रांना दोष दिला, नंतर देवाचे उपाय केले, औषध देऊन बघितले पण काहीच उपयोग झाला नाही. साधारणपणे आपल्याकडे असे काही झाले कि लगेच दोष बायकोलाच दिला जातो तसेच सगळे मला दोष द्यायला लागले. तुझीच चूक असेल, तुझे लक्ष नाही वगैरे. माझे माझ्यापरीने उपाय सुरु होते. कधी समजावून सांग तर कधी चिडून, रागावून सांग तर कधी नवस कर असे सगळे प्रकार सुरु होते. पण उपयोग झाला नाही त्याची तब्येत बिघडत गेली. दोन मुलांची जबाबदारी आणि त्यात याचे असे वागणे मला काहीच सुचत नव्हते. खरे तर पूर्ण सुन्न झाले होते. काहीच मार्ग दिसत नव्हता तशात अचानक मैत्री व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता मिळाला. अमोघची तब्येत बिघडली होतीच त्यामुळे तो पण ऍडमिट व्हायला लगेच तयार झाला आणि त्याला मैत्रीमध्ये ऍडमिट केले.
मैत्री मध्ये तुषार सर, रवी सरांची भेट झाली. त्यांनी हा आजार आहे, योग्य उपचार केले आणि काळजी घेतली तर यातून हा बाहेर निघू शकेल असे सांगितले. तुषार सर आणि रवी सरांनी या आजाराबद्दल, उपचाराबद्दल दिलेली सविस्तर माहिती आणि त्यांची या व्यसनमुक्तीच्या कामाबद्दलची तळमळ बघून आता थोडी आशा वाटायला लागली. आम्ही दर १५ दिवसांनी अमोघला भेटायला नागपूरला जात होतो, फोन वरून चौकशी करत होतो पण तुषार सर, रवी सर कधीही न कंटाळता, न चिडता शांतपणे आम्हाला धीर देत होते, आम्हाला मार्ग सांगत होते. अमोघ ३ महिने ऍडमिट होता, त्या काळात गणपती, नवरात्र असे सण त्याच्याशिवाय करावे लागले. आधी कधी असे झाले नव्हते, मुलांना पण त्याची आठवण यायची. त्यामुळे एकीकडे वाईट वाटत होते तर हे सगळे त्याच्या भल्यासाठी सुरु आहे असे समाधान पण होते. ३ महिन्यानंतर तो परत आला आता सगळे ठीक होईल या अपेक्षेत असतानाच काही दिवसात त्याचे व्यसन पुन्हा सुरु झाले. यावेळी तर दुप्पट प्रमाणात सुरु झाले.
आता मात्र माझा धीर सुटायला लागला. मुलांची काळजी, अमोघच्या राग, भविष्यात काय होईल त्याचे टेन्शन अशा सगळ्या भावना एकदम यायच्या. अमोघची तब्येत जास्तच बिघडत चालली होती. तुषार सर धीर देत होते. त्यांचा सल्ला घेऊन ठरवले कि आता कठोर निर्णय घ्यायचा त्याशिवाय पर्याय नाही. अमोघला परत ऍडमिट करून मी मुलांना घेऊन पुण्याला आली. इथे जॉब सुरु केला. तुषार सरांशी सतत बोलणे सुरु होतेच. या वेळी मात्र अमोघ उपचारांबद्दल गंभीर होता. काही महिन्यात तो पण पुण्यात आला जॉब सुरु केला. चढउतार सुरु होते. सासरे अचानक गेले, सासूचे आजारपणानंतर निधन झाले पण अमोघ तुषार सर, रवी सरांचा सल्ला घेत होता, त्यांच्याशी सतत बोलत होता आणि त्यातून त्याची व्यसनमुक्ती टिकवून ठेवली. यात माझा रोल इतकाच असतो कि जेव्हा अमोघ टेन्शन मध्ये असतो तेव्हा मी शांत राहून त्याच्याशी सतत बोलत राहते, तो कुठे कमी पडत असेल तर धीर देते आणि जुन्या आठवणी काढून कधी त्याला बोलत नाही. व्यसन हा आजार आहे हे कायम लक्षात ठेवून आपला संयम राखून, त्याच्या मानसिक पातळीवर जाऊन नीट संवाद साधते, त्याच्या चुका त्याला न दुखवता योग्य पद्धतीने सांगते याशिवाय अजूनही अमोघचे वागणे बदलले किंवा इतर काही निर्णय घ्यायचा असेल तर मी आधी तुषार सरांना कॉल करते. ते पण मोठ्या भावाप्रमाणे मार्ग सांगतात. त्यांना अमोघची मानसिकता अचूक महिती आहे आणि तो कोणत्या वेळी काय विचार करू शकतो याचा त्यांना जास्त अनुभव आहे म्हणून मीसुद्धा सतत त्यांचा सल्ला घेत असते. या पद्धतीने आपण वागलो तर आपल्या व्यक्तीला व्यसनापासून निश्चित दूर राहायला मदत करू शकतो.
धन्यवाद तुषार सर, रवी सर आणि मैत्री परिवार !

No comments:
Post a Comment