महोदय / महोदया,
''अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ'' गेल्या पाच वर्षांपासुन ब्राह्मण संघटन व समाज जागृतीचे कार्य सातत्यानी करीत आहे, हे आपण जाणताच. ब्राह्मण समाजावर होणारे वैचारिक हल्ले असोत वा युवक वर्गाला भेडसावणारी नोकरीची समस्या असो ''अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ'' समाजहितासाठी अविरत संघर्ष करीत आहे. नुकतेच न्यु इंग्लिश स्कुल, रमणबाग, पुणे येथे विशाल ''ब्राह्मण महाअधिवेशन'' आयोजित करण्यात आले होते.
समाज जागृती या आपल्या ध्येयाला अनुसरुन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आगामी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ''मतदार जागृती अभियान'' हा उपक्रम राबवत आहे. योग्य व सक्षम उमेदवार निवडुन येणे तसेच जास्तीत जास्त ब्राह्मण उमेदवार यावेळेस नगरसेवकपदी निवडुन यावेत यासाठी अ.भा.ब्रा.महासंघ प्रयत्नरत आहे. अ.भा.ब्रा. महासंघाचे मुखपत्र ''ब्रह्म केसरी'' या माध्यमातुन हे अभियान राबविण्यात येणार आहे.
''मतदार जागृती अभियान'' या उपक्रमाव्दारे खालील मुद्द्यांकडे समाजबांधवांवे लक्ष वेधणे अपेक्षित आहे.
* विद्यमान नगरसेवकांनी केलेले विकास कामे मतदारांसमोर मांडणे.
* इच्छुक उमेदवारांचा जाहीरनामा मतदारांसमोर ठेवणे.
* समाजात आलेले राजकीय औदासिन्य घालवणे.
* आत्मकेंद्रीतता सोडुन अधिक समाजाभिमुख होण्याची गरज मतदारांना पटवुन देणे.
* राजकीय क्षेत्रात समाज बांधवांचा सहभाग वाढवणे.
* ''संघटीत मतदानाचे'' महत्व मतदारांना समजावुन सांगणे.
* ''शत-प्रतिशत'' अर्थात 100 % मतदान होईल यासाठी प्रयास करणे.
या उपक्रमाला आपले सहकार्य मिळेल व त्यातुन जास्तीत जास्त मतदारांमधे जागृती निर्माण करता येईल अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद !
आपला

No comments:
Post a Comment